#Malshiras:माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले

सत्ताधाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने थोबाडले - आ. राम सातपुते

महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे
ठाकरे पवार सरकारने हुकूमशाही पद्धतीने आमचे केलेले निलंबन आज सुप्रीम कोर्टात रद्द झाले विधानसभा कोणाच्या बापाची जाहागिरी नाही आम्हाला जनतेने निवडून दिलेले आहे आजचा निर्णय म्हणजे सत्ताधाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने थोबडले आहे असे माळशिरस चे आमदार राम सातपुते यांनी 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले
सन 2021 मध्ये भाजपच्या आ. राम सातपुते आ. आशिष शेलार , आ. गिरीश महाजन ,आ. अतुल भातखळकर, आ. डॉ. संजय कुटे, आ. जयकुमार रावल, आ. नारायण कुचे ,आ. पराग अळवणी, आ अभिमन्यू पवार ,आ. योगेश सागर, आ. हरीश पिंपळे ,आ. बंटी भांगडिया या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते सभागृहात पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षण व इम्पिरिकल डाटा या विषयावर चर्चा सुरू असताना अभूतपूर्व गोंधळ झाल्याबद्दल या बारा आमदारांवर गैरवर्तनाचा ठपका ठेवून राज्य सरकारने या बारा आमदारांचे निलंबन केले होते यानंतर या बारा आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी वारंवार विनंतीही करण्यात आली परंतु याचा फारसा उपयोग झाला नाही.

अखेर 28 जानेवारी 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने या 12 आमदारांचे निलंबन रद्द करताना सांगितले आहे की, आर्टिकल 190 (4) नुसार कोणत्याही सदस्याला 60 दिवसांपेक्षा जास्त कालावधी करीता निलंबित करणे हे असंवैधानिक असून अशाप्रकारे एक वर्षासाठी निलंबन करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे यामुळे आज 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्यात येत आहे हे 12 आमदार आता सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत .

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून बारा समर्थनार्थ माळशिरस येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून निर्णयाचे स्वागत केले. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य व सोलापूर जिल्हा सहप्रभारी के.के. पाटील, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपान काका नारनवर, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ओबीसीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, युवा नेते आकाश सावंत, भाजपचे तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, तालुका उपाध्यक्ष व डोंबाळवाडीचे सरपंच पिंटूशेठ माने, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर अजित वाघ आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम