#Pune:प्रजासत्ताक दिनानिमित्त दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
महादरबार न्यूज नेटवर्क -
वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम अशा डिगेवस्ती मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना टेलर ऑर्गनायझेशन संस्थेचे लोकेश बापट सर व तुकारामदादा कोकरे-पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख- ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या माध्यमातून डिगेवस्ती येथील मुलांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच-संतोष कोकरे, पोलीस पाटील- विलास कोकरे, सदस्य-सुरेखा तुकाराम कोकरे, मुख्याध्यापक- दिलीप गायकवाड सर,नागनाथ कोळी सर सामाजिक कार्यकर्ते-रामचंद्र कोकरे व डिगेवस्ती ग्रामस्थ उपस्थित होते
वेल्हे तालुक्यामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना प्रजासत्ताक दिना निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची डिगेवस्ती, टेकपोळे ,माणगाव, पोळे ,ठाणगाव, शिरकोली ,गिवशी ,आंबेगाव
वडघर ,चिमकोडी,येथे प्रतिमा वाटप करण्यात आले तुकारामदादा कोकरे-पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख- ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, नथुराम डोईफोडे-युवक अध्यक्ष पुणे जिल्हा व अध्यक्ष वेल्हे तालुका ,युवक अध्यक्ष वेल्हे तालुका-संजय हिरवे यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच-संतोष कोकरे, पोलीस पाटील- विलास कोकरे, सदस्य-सुरेखा तुकाराम कोकरे, मुख्याध्यापक- दिलीप गायकवाड सर,नागनाथ कोळी सर सामाजिक कार्यकर्ते-रामचंद्र कोकरे व डिगेवस्ती ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment