#Pune:मुलखावेगळा माणूस : छायाचित्रातून उलगडले आगळे व्यक्तीमत्व डॉ. दीपक बुंदेले

दीपक बुंदेले ह्यांच्या उपक्रमाची आठ "वर्ल्ड रेकॉर्ड्स" व "इंडिया बुक ऑफ रेकॉड्स मधे नोंद

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी दीपक बुंदेले ह्यांना सन्मान पत्र देऊन केला खास गौरव आपण जर आजुबाजुच्या जगात डोकावले तर जाणवते की सर्वसामान्यपणे माणूस एका विशिष्ठ चाकोरीतच जगत असतो, 'जरा हटके' दैदिप्यमान कामगिरी करुन जीवन जगणारे काही 'अलग आदमी ' असतात. होय अश्याच 'अलग आदमी' ची मी आज महाराष्ट्राला ओळख करुन देणार आहे, ती व्यक्ति म्हणजे दीपक बुंदेले. दीपक बुंदेले लेखन असू दे वा वकृत्व(निवेदक) असू दे वा छायाचित्र असू दे वा अजुन कोणतेही क्षेत्र दे, बुदधी व्  मेहनतीच्या जोरावर कायम चमकतच असते. यश म्हणजे प्रचंड पैसा असणे असे नव्हे, हे दीपक बुंदेले ह्यांचे यश सांगते त्यांच्या वाटचालीवर टाकलेला प्रकाशझोत. 

दीपक बुंदेले हे एका वेगळ्याच संग्रहाने प्रसिद्धीच्या झोतात येतायेत. साधारणपणे पंचवीस वर्षापूर्वी त्यानी विविध वर्तमान पत्रात पत्रलेखनाला सुरुवात केली, पुण्यातील विविध नागरी प्रश्नावर आधारीत अशी त्यांची पत्रे असायची. ह्यातूनच त्यानी वृत्तपत्रात स्तभलेखनाला सुरुवात केली, त्यात त्यानी अष्टपैलू बुद्धिची चमक दाखवत राजकीय,सामाजिक,क्रीड़ा व मनोरंजनात्मक ही लेखन केले, या सर्व बाबी ते केवळ आवड़ म्हणून आणि समाज कारणाची तळमळ म्हणून करत होते, ह्यातूनच त्यांना 'युवा-भारत पुरस्कार, पत्र-मित्र पुरस्कार, गौरव पुरस्कार व् असे अनेक पुरस्कार मिळाले, एका कार्यक्रमात प्रसिध्द अभिनेत्याच्या हस्ते त्यांना पारितोषिक मिळाले व् ती बातमी, छायाचित्र वृत्तपत्रात छापुन आली आणि तेथुनच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिना आणि अभिनेत्याना भेटण्याचा दीपक ह्यांना छंदच जडला. 

राजकारणातील, समाजकारणातील व्यक्ति, अभिनेते, अभिनेत्री, खेळाडू, गायक, संगीतकार अश्या सुमारे १५०० व्यक्तीना ते आजपर्यंत प्रत्यक्ष भेटले आणि त्यांच्या सह्यांचा संग्रह व् त्याचबरोबरील छायाचित्रांचा संग्रह आजमितीस ८४०० पर्यंत पोहचला. त्यांच बरोबर सह्यांच्या संग्रहात ते त्या व्यक्तीला कधी, कोठे, कोणत्या वेळी भेटले ह्यांची सविस्तर टिपणेही बघायला मिळतात. तसेस कलाकारांची माहिती व त्यांच्यासमवेत असलेले छायाचित्र ते नेहमीच फेसबुकवरही शेअर करतात व् त्यातूनच त्यांचे देश-विदेशात अंसख्य चाहते ही निर्माण झाले आहेत. 

असे हे अलग आदमी, वेग-वेगळ्या छंदाने झपाटलेल्या दीपक बुंदेले यांचे या संग्रहाबद्दल तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुलकलाम, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुषमा स्वराज, अभिनेता मिथुन चक्रवर्ती, माधुरी दीक्षित यांनीही कौतुक केले आहे. त्यांच्या ह्या छंदाची नोंद नुकतीच ओएमजी "वर्ल्ड रेकॉर्डस", इमिका वर्ल्ड रेकॉर्डस,किंग्डम ऑफ टॅलेंट वर्ल्ड रेकॉर्डस्, गोल्ड स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् जेनूइन टॅलेंट ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस, स्टार बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल, ब्रिलीयन्स वर्ल्ड रेकॉर्ड, एक्सलेन्स वर्ल्ड रेकॉर्ड मधेही झाली आहे तर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मधे त्याची नोंद होऊन जागतिक व राष्ट्रीय विक्रम दोघेही त्याच्या नावावर आहे.हे सर्व त्यांनी साध्य केले आहेे. ते फावल्या वेळातून हे विशेष व सर्वसामान्य माणसप्रमाणे नोँकरी व् प्रपंच व्यवस्थीत सांभाळून हे साध्य केले आहे. ह्याशिवाय ते उत्कृष्ठ वकते सुध्दा आहेत व ते निवेदक(सूत्रसंचालक) म्हणून ही कार्यरत आहे, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहुन खास वकृत्वासाठी बोलावले जाते. आतापर्यंत त्यांचे ३४७ लेख विविध वृत्तपत्रातुन प्रसिध्द झाले आहेत. 

छायाचित्र संग्रहाच्या बाबतीत आतापर्यंत विविध क्षेत्रातील जवळपास १५०० व्यक्तींच्या भेटी-गाठी घेऊन ८४०० हजार छायाचित्रांचा संग्रह आहे.माजी राष्ट्रपती ए. पी.जे. अब्दुलकलाम, प्रतिभा पाटिल, मा. पंतप्रधान एच. डी. देवेगौड़ा, स्वामी रामदेवबाबा, अण्णा हजारे, अमिताभ बच्चन, शाहरुख़ खान, माधुरी दीक्षीत, कपिल देव, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी अश्या हजारो जणांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी घेऊन त्यांच्यासोबत छायाचित्र व ऑटोग्राफ घेतले. छंद जोपासत असताना त्यांनी काही निवडक आठवणी सांगीतल्या " मा.राष्ट्रपती ए. पी.जे. अब्दुलकलाम, सुषमा स्वराज, उद्धव ठाकरे ह्यांनी खास  वेळ देऊन संपूर्ण संग्रह बघितला व् कौतुक केले. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष दखल घेतली आणि पत्राद्वारे कौतुक केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी दीपक बुंदेले ह्यांना सन्मान पत्र देऊन केला खास गौरव, अभिनेता मिथुन चक्रवर्ती व अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासोबत घेतलेले छायाचित्र त्यांना खुप आवडल्याने त्यांनी माझ्याकडून छायाचित्रांची प्रत मागून घेतली व आभार व्यक्त केले. 

दीपक बुंदेले एवढ्या व्यक्तीना भेटले ते विशेषत: वृत्तपत्रातुन येणाऱ्या स्थानिक कार्यक्रमाच्या यादीतुन, पुण्या- मुंबईतील विविध नाट्यगृहातून, पुण्या-मुंबईत होणाऱ्या वेगवेगळ्या ठिकांणच्या शूटिंग्ज मधून विविध पंचतारांकित हॉटेल मधून, शासकीय विश्रामगृहातून, मंत्रालयातून आणि मुंबईतील अनेक स्टुडिओजमधून. दीपक बुंदेले ह्यांनी लिहिलेल्या काही निवडक लेखाचे पुस्तक- दीपमंथन हे ही प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दस्तूरखुद राज ठाकरे ह्यांनी केले आहे, दीपक बुंदेले ह्यांच्या टी.व्ही. व आकाशवाणी वरही मुलाखती झालेल्या आहेत. आता अमेरिकन विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवीच्या सन्मानित ही करण्यात आले अश्या छंदप्रेमी, लेखक, वक्ता व सामान्यपणे जीवन जगत असताना असामान्य कामगिरी करणाऱ्या या 'अलग आदमी' चे कौतुक करावे तितके कमीच आहे, डॉ.दीपक बुंदेले ह्यांना व त्यांच्या कर्तुत्वाला सलाम!

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत