#Natepute:रस्ता खुला करण्यासाठी केलेले गुरसाळे ग्रामस्थांचे आत्मदहन प्रशासनाच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित

महादरबार न्यूज नेटवर्क -

सध्या ऊस कारखाने चालू आहेत शेतकऱ्यांना यांच्या शेतातील ऊस कारखान्याला घालवण्यासाठी तसेच येण्या जाण्यासाठी रस्ता संतोष पाटील यांनी अडवणूक केल्याने संतप्त झालेल्या गुरसाळे  येथील ग्रामस्थांनी सामूहिक रस्ता खुला करून न दिल्यास आत्मदहन करणार असल्याचे निवेदन तहसील कार्यालय येथे दिले होते. 

गुरसाळे गावच्या ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल घेत तहसील कार्यालय माळशिरस ,पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम विभाग, शेती महामंडळ या विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

प्रत्यक्ष पाहणी दरम्यान दगडी खान ते पालखी पार रस्त्याच्या मध्यभागी संतोष पाटील यांनी नारळाचे झाड लावून वाहतुकीस अडथळा केल्याचे दिसून आले.  रोजगार हमी रस्ता कुठल्या गटातून गेला हे पाहण्यासाठी व त्याची शहानिशा करण्यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व शेती महामंडळ यांच्याकडून सर्व माहिती घेण्यासाठी वेळ लागत असल्याने सुट्टीचे दिवस सोडून दहा दिवस लागतील तोपर्यंत आपले सामूहिक आत्मदहन स्थगित करावे अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता अशोकराव रणवरे  यांच्या सहीने नायब तहसीलदार सानप यांनी आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले.

त्यावेळी मंडलाधिकारी तलाठी, ग्रामसेवक, शेती महामंडळाचे अधिकारी व उपोषण कर्ते यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर आत्मदहन करणारे शेतकरी  दत्तात्रय विठोबा शेळके, महादेव विलास मोरे, लहू महादेव मोरे ,राजेंद्र गेना गाढवे, रामचंद्र मुगुटराव गायकवाड, तुकाराम पंढरीनाथ गायकवाड, युवराज संजय गायकवाड ,विशाल संजय सावंत यांनी तहसीलदार यांना सामूहिक आत्मदहन मागे घेत असल्याचे लेखी पत्र दिले.

यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की रस्ता खुला न झाल्यास मोठ्या संख्येने शेतकरी आत्मदहन करणार आहेत.





Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत