#Natepute:विद्यार्थ्यांचे कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यश - बाबाराजे देशमुख
महादरबार न्यूज नेटवर्क -
कोरोनाची भयानक परिस्थिती होती.यामुळे शाळा बंद होत्या.तरीही विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत चांगले यश मिळविले असे मत माजी जि.प.उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी व्यक्त केले.
ते इंटरनॅशनल टॅलेंट सर्च इक्झामच्यावतीने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी 'गौरव गुणवंताचा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इ.५ वी,इ.८ वी मधील शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
बाबाराजे देशमुख पुढे बोलताना म्हणाले,कोरोना काळात सर्वांवर वाईट वेळ आली होती.लाॅकडाऊन मध्ये सर्वजणच घरी असल्याने अभ्यासाला अडथळे आणि शाळा बंद अशा काळात मनोबल टिकवून विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत चांगले यश मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले.
सपोनि मनोज सोनवलकर म्हणाले,स्वतः मी देखील ग्रामीण भागातूनच आलेलो आहे.शाळेत असताना पाठीमागील रंगेत बसलेलो असायचो.कार्यक्रमात पुढची खर्ची आपणास कधी मिळेल असे वाटायचे यातुन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला व यशस्वी झालो.तुम्हीही हे यश शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून मिळविले आहे.हा स्पर्धा परीक्षेचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.
नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले,जे महान व्यक्ती होऊन गेले त्यांची सवय वाचनाची होती.विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या सवयी तसेच पुस्तकाबरोबरच अवांतर वाचनाची आवड निर्माण करावी,वाचना बरोबरच रोजनिशी लिहावी . मोबाईल पेक्षा या सवयी जपल्या तर निश्चित यशस्वी व्हाल .
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख,सहा.पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर,नगरपंचायत मुख्याधिकारी माधव खांडेकर,प्रशांत सरूडकर,संभाजी फुले,ज्ञानदीप संस्थेचे संस्थापक मारुती ढोबळे,इंटरनॅशनल टॅलेंट सर्चचे राज्य समन्वयक आनंदकुमार लोंढे,संचालक अंकुश कर्चे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी सोनवले,सारिका वाघ तर उपस्थितांचे आभार अंकुश कर्चे यांनी मानले.
Comments
Post a Comment