#Thane:भिवंडीतील युवा कवी मिलिंद जाधव यांची मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड मंध्ये नोंद

''सर्वोत्कृष्ट कवी''  पुरस्काराने सन्मानित 

महादरबार न्यूज नेटवर्क -

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे राहणारे युवा कवी  व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी तालुका सचिव मिलिंद सुरेश जाधव यांची मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड  मध्ये  नोंद झाली असून  बेस्ट अचिव्हर्स अवॉर्ड- २०२१ मधील ''सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार'' त्यांना प्रदान करण्यात आला आहे.


युवा कवी मिलिंद जाधव हे भिवंडी तालुक्यातील समतानगर, पडघा या ग्रामीण भागात  राहत असून ''लोकधारा प्रतिष्ठान''ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ते विविध विषयावर उत्तम कविता लिहून  प्रबोधन करीत असतात. त्यांचा सामाजिक तसेच  विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो. विविध कवी, साहित्य संमेलनात त्यांचा  सहभाग असून विविध विषयांवर प्रबोधनात्मक कविता शाळेत  तर विविध ठिकाणी सादर करीत प्रबोधन करीत असतात. एवढंच नव्हे तर, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे  एक युवा कवी  म्हणून त्यांची ओळख आज इतरांच्या नजरेतून पाहायला मिळते. अनेक कार्यक्रमात ते सूत्रसंचालनाची धुरा सुध्दा सांभाळत असतात.  म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन  भिवंडी तालुक्यातील पडघा येथे राहणारे युवा कवी मिलिंद सुरेश जाधव यांची मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड  मध्ये  नोंद झाली असून  बेस्ट अचिव्हर्स अवॉर्ड- २०२१ मधील ''सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार'' प्रदान करण्यात आला आहे. 

पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून युवा कवी मिलिंद  जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून  त्यांचे  कौतुक केले जात आहे.विशेष म्हणजे दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने एनसीआर दिल्ली येथून मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष डॉ. सी. पी. यादव यांच्याकडुन पोस्टाने हा सन्मान पाठविण्यात  आला आहे.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत