#Satara:मकरसंक्रांतीनिमित्त माण तालुक्यातील महत्वाची धार्मिक स्थळे राहणार बंद
मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी यांचे स्थानिक प्रशासनाला आदेश
महादरबार न्यूज नेटवर्क - एकनाथ वाघमोडे
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाला लक्षात घेता मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला जिल्हाप्रशासन सजग झाले असून मकरसंक्रांतीनिमित्त माण तालुक्यात सुमारे एक ते दीड लाख महिला या माण तालुक्यातील विविध धार्मिक ठिकाणी देवदर्शनासाठी येत असतात,त्यामुळं होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाप्रशासन सज्ज झाले असून माण तालुक्यातील स्थानिक प्रशासनाला आस्थापना व जमावबंदीचे आदेश मा.जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.
माण तालुक्यातील कुलकजाई येथील सीतामाई मंदिर,शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर आणि गोंदवले येथील ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर या महत्वाच्या आणि प्रसिद्द असणाऱ्या देवस्थानला भेट देण्यासाठी आणि दर्शनासाठी मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त मोठी गर्दी होत असते, कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता गर्दी होऊन अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत असतो,त्यामुळं जिल्हाधिकारी यांनी स्थानिक तालुका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना या महत्वाच्या ठिकाणी जमावबंदी आणि आस्थापना लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर देवस्थानच्या ५००मी.अंतरापर्यंत हे आस्थापनेचे आणि जमावबंदीचे नियम बंधनकारक राहतील अस जिल्हाधिकारी यांनी सदर आदेशात म्हटलं असून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे आदेश पालन करणे सर्वांना बंधनकारक राहील,नियम मोडणाऱ्यांनावर कारवाईचा बडगा उगारण्याचादेखील इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment