#Solapur:प्रशांत माळवदे यांना सुमंगलाय गुणवंत पत्रकार पुरस्कार

महादरबार न्यूज नेटवर्क -
सोलापूर जवळील शिंगडगाव येथील एस एस कलशेट्टी प्रतिष्ठानच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना  मंगलमलाय गुणवंत पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. 
यावेळी गौरव प्रमाणपत्र, ब्लूटूथ,शाल, श्रीफळ, हार व दिवाळी अंक भेट देऊन पत्रकारांना सन्मानित केले होते.
यावेळी  माळवदे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या निष्ठा पूर्वक कामाची, कार्याची आम्ही दखल घेत आहोत .या आपल्या विधायकतेतून समाज आणि राष्ट्राची मोठी प्रगती होणार आहे. यावर आमचा विश्वास आहे . कोविड -19 च्या काळात आपण केलेले कार्य उल्लेखनीय आहे. म्हणूनच आपणास सुमंगलाय गुणवंत पत्रकार पुरस्कार सन्मान देताना मनस्वी आनंद होत आहे तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्य करत असताना भविष्यात समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वस्तुनिष्ठ ,दृष्टिकोन समोर ठेवून आपल्या हातून समाजसेवेचे उत्तुंग कार्य घडो हीच सदिच्छा असे मत अध्यक्ष प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले.

या पूर्वी हि पत्रकार सुरक्षा समितीचा आदर्श पत्रकार पुरस्कार, ओबीसी फाउंडेशन समाजसेवक पुरस्कार, हिंदुस्तान 24 तास यांचा कोवीड योद्धा ,जीवन आधार फाऊंडेशनचा पर्यावरण रक्षक,परशुराम सेवा संघाचा कोविड योद्धा ,ड्रीम फाऊंडेशनचा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध मान्यवरांच्या कडून माळवदे यांचे कौतुक करुन अभिनंदन केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम