#Chiplun:संरक्षण भिंत उभारल्याशिवाय परशुराम घाट काम न करण्याची आमदार शेखर निकमांची सुचना
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
दोन दिवसांपूर्वी परशुराम घाटात दरड कोसळून पोकलेन मशिनमधील एक कामगाराचा मृत्यू झाला होता.याबाबत आमदार शेखर निकम यांनी परशुराम घाटातील कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.यावेळी पेढे गावच्या बाजूला जेवढा धोकादायक भाग आहे तिथे ५ मीटर उंचीची भिंत उभारल्याशिवाय सदर महामार्गाचे काम न करण्याच्या सूचना आमदार निकम यांनी केल्या.
यावेळी कल्याण टोलवेज कंपनीचे ठेकेदार ,तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग महाडचे मुख्य अभियंता बांगर,अधीक्षक अभियंता माडकर,चिपळूण बांधकामचे रॉजर मराठे,नायब तहसीलदार तानाजी शेजाळ,पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे ,माजी जि प सदस्य विश्वास सुर्वे,पेढे सरपंच प्रवीण पाकळे,राष्ट्रवादी युवक सरचिटणीस तुषार गमरे,मोहन शिंदे,सुधीर भोसले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी आमदार निकम यांनी मृत्यू पावलेल्या कामगाराची माहिती घेतली.मागील आठवड्यात घाटातून भलामोठा दगड पेढे गावात कोसळला होता.सुदैवाने जीवितहानी टळली होती.त्याचवेळी आमदार निकम यांनी संबधित यंत्रणेला ग्रामस्थांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन नंतरच घाटातील काम करण्याच्या स्पष्ट सूचना केल्या होत्या.आता यापुढे पेढे गावातील एक कमिटी नियुक्त केली असून त्यांच्याकडे संपर्क करूनच पुढील कामकाज करण्याच्या सूचना देखील आमदार यांनी दिल्या आहेत.
गुरुवार दिनांक १० फेब्रुवारीला भूगर्भ विभागाच्या अधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.पेढे गावातील जास्त धोकादायक भागात असणाऱ्या पानकर वाडी व बौद्ध वाडी येथील ग्रामस्थांच्या सुरक्षितेकडे जास्त लक्ष देण्याच्या सूचना देखील संबंधित यंत्रणेला निकम यांनी केल्या आहेत.
Comments
Post a Comment