#Chiplun:माखजन इंग्लिश स्कूल माखजन माजी विद्यार्थी ' स्पंदन २०००- २००१ स्नेहमेळावा उत्साहात साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
होळीचा सण म्हटला की कोकणवासीयांसाठी आनंदाची पर्वणी तर असतेच परंतु चाकरमान्यांसाठी एकत्र येऊन माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणीत रममाण होऊन सण साजरा करत जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे एक निमित्त असते. नाही म्हणायला गणपती, दिवाळी या निमित्ताने कोकणवासीय एकत्र येतच असतात परंतु होळी आणि धुलीवंदनाची मजा काही औरच असते. या सणांदिवशी देवी देवतांची यात्राही असते शिवाय मित्र-मैत्रिणींसोबत रंग खेळताना लहानपणीच्या आठवणीही जागृत होतात.
     
अशाच काहीशा लहानपणीच्या आठवणी जागवत गावापासून दूर पुणे-मुंबई, कोल्हापुर सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त गेलेल्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन मधील माजी विद्यार्थीनी नुकताच स्पंदन २०००-२००१ रि-युनियन हा बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा एक छोटासा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम धामणी येथील राई  रीसाॅर्ट येथे आयोजित केला होता.
     
यावेळी प्रत्येकाने शाळा-कॉलेज पूर्ण केल्यानंतर आत्ता कोण-कोण, काय-काय काम करत आहे हे जाणून घेत प्रत्येकाच्या कौटुंबिक स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बालपणीचे काही खेळ खेळत संगीताच्या तालावर गाणी गाण्याचा आनंदही घेतला. धामणी येथील एका हॉटेलात आयोजित कार्यक्रमात सर्वांनी शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वादही घेतला.सर्व कार्यक्रमाचे नियोजन पल्लवी तांबे यांनी केले तसेच नमीता पाटणकर, ओंमकार नामजोशी, वैशाली हेमण, प्रसन्ना लघाटे,अमोल चव्हाण , दयानंद जोगळे आणि भुषण भुवड यांनी सर्वांचे आभार मानले. 
      
सायंकाळी घराकडे परतताना प्रत्येकाच्या डोळ्यात तरळणार्‍या विरहाच्या भावना आणि आपल्या मित्रांपासून काही काळाकरिता अलग होण्याच्या कल्पनेने सर्व मित्र-मैत्रिणींचे डोळे पाणावले. पुन्हा एकदा एखाद्या सणाच्या निमित्ताने एकत्र येण्याच्या निश्चयाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत