#Natepute:नातेपुते पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणारी टोळी केली जेरबंद


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते पोलीस ठाणेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मोटार सायकल चोरी करणारी चोरांची टोळी जेरबंद करुन त्यांचेकडुन ६,२५,००० / - रुपये किंमतीच्या एकूण ० ९ मोटार सायकली केल्या जप्त.

नातेपुते पोलीस ठाणे गुरनं ७३ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक ०२/०३/२०२२ रोजी दाखल असून सदर गुन्हयाचे तपासकामी  डॉ . बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी , अकलुज विभाग , अकलुज व नातेपुते पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे तपास करीत असताना नातेपुते पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी गोपणीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , मौजे मांडवे गावातील पुणे पंढरपुर रोडवर अहिल्याचौक येथे दोन मुले संशयितरित्या बुलेट मोटारसायकलवर फिरत आहेत . अशी बातमी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे  तानाजी पवार पोलीस उप निरीक्षक व त्यांचे पथकास मिळाली , सदर दोन मुलांना ताब्यात घेवून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असलचे व इतर मोटार सायकली ही त्याचे ०१ साथिदारा ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे मदतीने चोरलेल्या असल्याचे सांगितल्याने . 

सदर गुन्हयाचे तपासकामी आरोपीनामे अदित्य रामभाउ सकट वय २१ वर्षे , काशलिंग उर्फ काशिनाथ दत्तात्रय लोखंडे वय १ ९ वर्षे दोघे रा विजयवाडी ता माळशिरस अटक करून व ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदर गुन्हयातील १ बुलेट मोटार सायकल व इतर ०२ बुलेट , ०१ पॅशन , ०२ स्पेल्डर , ०१ ड्रिम युगा ०१ प्लॅटीना , ०१ एच एफ डिलक्स अशा अशा एकुण ६,२५,००० / - रु च्या ९ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत . 

वरील प्रमाणे गुन्हयात जप्त केलेल्या मोटार सायकली हया नातेपुते शहरातील व अकलूज , माळशिरस , फलटण , इंदापुर , आटपाडी , खडक ( पुणे शहर ) , इत्यादी गावातील आहेत . सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक मा . तेजस्वी सातपुते मॅडम , अपर पोलीस अधिक्षक श्री . हिंमतराव जाधव सो , मा . श्री . डॉ . बसवराज शिवपूजे सो , उपविभागीय पोलीस अधिकारी , अकलुज विभाग अकलुज व सहा. पोलीस निरीक्षक  श्री . मनोज सोनवलकर यांचे मार्गदर्शनाखाली , गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई तानाजी पवार , पोहेकॉ . राहुल रणनवरे , पोना. नवनाथ माने , पोना. मसाजी थोरात , पोना. महेश पाटील , पोकॉ. मन्सुर नदाफ , पोकॉ. राजेंद्र सदगर, पोकॉ. अजित कडाळे , पोकॉ.गणेश कापसे यांनी केली असून सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस हवालदार राहुल रणनवरे , पोलीस नाईक नवनाथ माने हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम