#Chiplun:चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला मोठे यश



मौजे कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक व परिसर सुशोभिकरणासाठी  ५ कोटीचा निधी मंजूर

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव              चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील संगमेश्वर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य होते या पवित्र ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक स्मारक संग्रहालय व अभ्यासकेंद्र उभारण्याचे काम मागील कित्येक दिवस प्रस्तावित होते. 

मध्यंतरीच्या काळात निधीअभावी हे काम रखडले होते. इमारतीची पूर्तता, बंदिस्तीकरण, आवार सुशोभिकरण, शिवकालीन वस्तू संग्रहित करुन त्यांचे जतन करणे, महाराजांच्या जीवनावरील महत्वाच्या प्रसंगांचे सादरीकरण तसेच महाराजांच्या जीवनावरील लेखन साहित्य संग्रही करुन ते अभ्यासकांसाठी उपलब्ध करणे, नवीन बदललेल्या राष्ट्रीय महामार्गापासून जोडरस्ता करणे इत्यादि कामांची पूर्तता करणे या सर्व कामासाठी निधीची आवश्यकता होती.

हा निधी तातडीने उपलब्ध व्हावा अशी शिवप्रेमींची व ग्रामस्थाची सतत ची मागणी होती. त्यांच्या  मागणीनुसार आमदार शेखर निकम यांनी यासाठी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यटनमंत्री यांचेकडे सततचा पाठपरावा करुन "प्रादेशिक पर्यटक विकास योजनेतर्गत" रु. ५ कोटीचा निधी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मंजूर करुन आणण्यात आला. त्यातील पहिल्या टप्प्यातील रु. दीड कोटीचा निधी वितरित केला गेला आहे.

हा निधी उपलब्ध झाल्याबद्दल आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, मा. बाळासाहेब थोरात साहेब यांचे आभार व्यक्त केले. तसेच पर्यटन मंत्री मा. नामदार श्री. आदित्य ठाकरे, राज्य पर्यटन मंत्री आदितीताई तटकरे यांचे विशेष आभार मानले आहेत.

त्याचबरोबर माजी जिल्हाप्रमुख जेष्ठ नेते  श्री. राजेंद्र महाडिक व कसबा ग्रामपंचायतीने यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सुद्धा आमदार शेखर निकम यांनी आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत