#Natepute:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या.जयंती निमित्त नातेपुते शहरात गेल्या १ एप्रिल पासून विविध कार्यक्रमांच्या द्वारे आदरांजली अर्पण करण्यात आली. १४ एप्रिल रोजी सकाळी भीम रॅली चे आयोजन करण्यात आले होते. रॅली ला सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी निळा झेंडा दाखवून प्रारंभ केला.यात तरुणांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात सहभाग घेऊन ही रॅली पार पाडली.

त्यानंतर  पंचशील ध्वजारोहण सहा.पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या हस्ते करून अभिवादन सभेला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बौद्धाचार्य  समीर सोरटे व प्रकाश साळवे यांनी बुद्धवंदना घेतली.
यावेळी छोटा वक्ता विश्वरत्न प्रकाश साळवे याने बाबासाहेबांचा जीवनपट मांडला.यावेळी जयंती समितीचे सदस्य सौरभ सोरटे,मराठा सेवा संघाचे डॉ.थोरात,सहा.पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर,रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सचिव एन के साळवे यांनी विचार व्यक्त केले.अध्यक्षीय भाषण जयंती समितीचे अध्यक्ष रणजित कसबे यांनी केले.
यावेळी विचारपिठावर रिपाई जेष्ठ नेते युवराज वाघमारे,नगरसेवक सुरेंद्र सोरटे,बाळासाहेब सोरटे,नवाज सोरटे,आप्पासाहेब सोनवणे,जनार्दन सोरटे,पांडुरंग सोरटे,माणिक देठे,श्रावण सोरटे,उपविभागीय कृषी अधिकारी बीड सुभाष साळवे, लतीब नदाफ, खजिनदार अभिजित वाळके,भारतीय बौद्ध महासभेचे शिवाजी सावंत,दिलीप साळवे तसेच किसन ढोबळे,कमलाकर भागवत,रोहित शेटे  व मान्यवर उपस्थित होते.

सकाळ पासून माळशिरस विधान सभा आमदार राम सातपुते,भाजप नेते बाळासाहेब सरगर,उपविभागीय पोलीस अधीक्षक अकलूज बसवराज शिवपुजे,महान भारत केसरी पै. माऊली जमदाडे, पै.संग्राम जठार,नातेपुते नगर पंचायत चे नुतन नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,बांधकाम समिती सभापती अतुल पाटील, रणजित पांढरे,अतुल बावकर,माऊली उराडे,संजय चांगण, बरडकर,दीपक काळे,रणवीर देशमुख आदी मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंती महोत्सव समिती चे सचिव समीर सोरटे व मा. ग्रा. प.सदस्य प्रकाश साळवे यांनी केले.प्रास्ताविक संघर्ष सोरटे यांनी तर आभार कार्याध्यक्ष सूचित साळवे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम जयंती समिती उपाध्यक्ष चंदन सोरटे,कुणाल बनसोडे,सदस्य सौरभ सोरटे,विनोद रणदिवे,संघर्ष सोरटे,दिलीप साळवे,विश्वजीत कांबळे,सम्यक सोरटे यांनी पर पाडला.

याच ठिकाणी गाव कामगार तलाठी प्रभाकर उन्हाळे,कोतवाल गोरख ढोबळे,गणेश जाधव व त्यांचे सहकारी यांनी १३१ व्या जयंती दिनाचे औचित्य साधुन १३१ किलो जिलेबी वाटप केली.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम