#Chiplun:आ.शेखर निकम यांनी चिपळूण व देवरुखसाठी आणला तब्बल ५ कोटीचा विकास निधी


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
चिपळूण व देवरुख शहराच्या विकासासाठी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री.शेखर निकम यांनी कटिबद्ध नगरविकास ठोक तरतुदी अंतर्गत चिपळूण व संगमेश्वरसाठी तब्बल पाच कोटीचा भरीव निधी आणला आहे. यातील चिपळूण शहरासाठी  ३ कोटी ७० लाख व देवरुख शहरासाठी १ कोटी ३० लाखाचा निधी विकास कामांसाठी मंजूर झाला आहे. यावेळी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री, महसुलमंत्री (महाविकास आघाडी सरकार) यांचे आभार मानले आहेत.

या निधीअतर्गत 
चिपळूण नगरपरिषद हद्दीतील१) रामतीर्थ तलावाशेजारील जलतरण तलावाचे नुतनीकरण करणे – ७५ लाख, २)चिपळूण नगरपरिषदेचे कै. अण्णासाहेब खेडेकर क्रिडा संकुल इमारतीचे बॅटमिंटन कोर्ट तयार करणे तसेच इतर इनडुअर खेळासाठी सुविधा विकसित करणे – ५०लाख, ३)चिपळूण नगरपरिषद हद्दीतील आरक्षण क्र. १४३ खेळाचे मैदान विकसित करणे – २५ लाख, ४)चिपळूण नगरपरिषद हद्दीतील आरक्षण क्र. १४४. फुलपाखरु उद्यान विकसित करणे – २५लाख, ५) चिपळूण नगरपरिषद हद्दीतील बाजारपेठ मधिल आरक्षण क्र. ४१ पार्किग क्षेत्र विकसित करणे – २५ लाख, ६) चिपळूण नगरपरिषद हद्दीतील भोगाळे येथील आरक्षण क्र. ८९ पार्किग क्षेत्र विकसित करणे – ४० लाख, ७) चिपळूण नगरपरिषद हद्दीतील विरेश्वर तलाव येथे ओपन जिमचे साहित्य पुरविणे व बसविणे – ८ लाख, ८) चिपळूण नगरपरिषद हद्दीतील नारायण तलाव येथे ओपन जिमचे साहित्य पुरविणे व बसविणे – ८लाख , ९) चिपळूण नगरपरिषद हद्दीतील पाग लेनवाडी येथे ओपन जिमचे साहित्य पुरविणे व बसविणे – ८लाख, १०) चिपळूण नगरपरिषद हद्दीतील उक्ताड खेळाचे मैदान येथे ओपन जिमचे साहित्य पुरविणे व बसविणे – ८ लाख, ११) चिपळूण नगरपरिषद हद्दीतील गोवळकोट खेळाचे मैदान येथे ओपन जिमचे साहित्य पुरविणे व बसविणे – ८लाख, १२) चिपळूण नगरपरिषद हद्दीतील पेठमाप मराठी शाळा येथे ओपन जिमचे साहित्य पुरविणे व बसविणे – ८लाख,  चिपळूण करीता मंजूर करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम