#Chiplun:आंबव पोंक्षे ग्रापंचायतीमार्फत स्वच्छतापुरक गृहोपयोगी वस्तूंचे वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे ग्रापंचायतीमार्फत प्रत्येक कुटुंबाला १५ व्या वित्त आयोगातील निधी खर्च करुन स्वच्छता पूरक अशा गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये ४३३ कुटुंबाना प्रत्येकी ५ वस्तू देण्यात आल्या.यामध्ये हॅन्डवॉश, सुपली,डसबिन,हारपीक, टूथपेस्ट आदीं वस्तूंचा समावेश आहे.

या वाटपावेळी सरपंच सौ प्रिया सुवरे,उपसरपंच शेखर उकार्डे,ग्रामसेवक व्ही एम दडस,ग्रामपंचायत सदस्य मंगेश मांडवकर,विद्या पकडे,दीपाली कुडतडकर,स्मिता सुतार,संजय भुवड,निधी भायजे आदी तर गोविंद पकडे,संजय पकडे,शांताराम घडशी,बाळू भायजे,यशवंत घडशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने राबवलेल्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम