#Satara:शिंगणापूर यात्रेत वीज वितरण विभागाचा खेळखंडोबा


 नियोजनाचा अभाव

महादरबार न्यूज नेटवर्क - एकनाथ वाघमोडे
शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा सुरू असतानाच वीज वितरण कडून दुरुस्ती व विजकनेक्शन देण्याच्या कारणास्तव वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. वीज वितरण विभागाच्या नियोजनाअभावी शिंगणापूर यात्रेत वीजपुरठयाचा खेळखंडोबा होत असून भाविकांसह स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

शिंगणापूर यात्रेपूर्वी वीज वितरण विभागामार्फत यात्रापरिसरात सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी दुरुस्तीची कामे केली जातात. तसेच यात्रेसाठी येणाऱ्या स्टॉलधारकांना तात्पुरती विजकनेक्शन दिली जातात. त्यासाठी काहीवेळा वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र यावर्षी विजवीतरणचे कर्मचारी विजकनेक्शन व दुरुस्तीच्या कारणास्तव वारंवार वीजपुरवठा बंद करत आहेत. व्यावसायिकांना विजकनेक्शन देताना सलग तीन-चार तास वीजपुरवठा खंडित करून एकाच वेळी वीज कनेक्शन देण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र  वीज  वितरण कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने यात्रा परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने यात्रेतील पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे, तर मंदिर परिसरातही भाविकांचे हाल होत आहेत. यात्रा मीटिंगमध्ये वीजपुरवठा सुरळीतपणे ठेवण्याबाबत चर्चा होत असते. मात्र प्रत्यक्षात   वीज वितरण  अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय नसल्याने ऐन यात्रा कालावधीत  वीजपुरवठयाचा खेळखंडोबा होत आहे. 

वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने ऐन उन्हाळ्यात असलेल्या शिंगणापूर यात्रेत भाविकांचे हाल होत आहेत. शनिवारपासून यात्रेचा मुख्य कालावधी असून यापुढे तरी वीजपुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवण्याची मागणी भाविक तसेच स्थानिक नागरिकांतून होत आहे.

यात्रा नियोजन केवळ कागदावर 
शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा मोठी भरते .यात्रा नियोजन  मिटिंग दोन वेळा असते .सर्व खात्याचे अधिकारी वर्ग उपस्थित असतो.
यात्रेचे नियोजन अधिकारी सांगतात त्याप्रमाणे होत नाही.अधिकारी वर्ग यात्रेचे नियोजन कागदावर ठेवण्यातच धन्यता मानत आहेत. मिटींगमध्ये केवळ कागदी घोडे नाचविले जातात. एकूणच यात्रेचे नियोजन केवळ कागदावरच राहत आहे.हे मात्र नक्की खर आहे.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत