#Dound/Yavat:दौंड येथे किरीट सोमय्यांच्या विरोधात शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
किरीट सोमय्यांविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणेबाबत शिवसेना आक्रमक
युद्धनौका आयएनएस विक्रांत च्या नावावर लोकांकडून जमा केलेल्या पैशाचा अपहार प्रकरणी दौंड शिवसेना आक्रमक झाली असून, आयएनएस विक्रांत घोटाळ्या प्रकरणी माजी खासदार भाजपा नेता किरिट सोमय्या याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणेची मागणी दौंड शिवसेनेचे वतीने करण्यात आली.
याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी दौंड शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक दौंड यांना निवेदन दिले.
यावेळी शिवसेनेच्या वतीने दौंड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर किरीट सोमय्या यांचे प्रतिमेला “ जोडे मारो “ आंदोलन करून करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आयएनएस विक्रांत नावे ५६ कोटी रुपये गोळा करून जनतेला आणि देशाला फसवणाऱ्या महाराष्ट्रद्रोही , देशद्रोही किरीट सोमय्या अटक करून तुरुंगात जाई पर्यंत शिवसैनिक गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी शिवसैनिकाकडून देण्यात आला.
आयएनएस विक्रांत भंगारात निघू नये, असं सांगत किरीट सोमय्या यांनी लोकांकडून माजी सैनिकांनीकडून पैसे जमा करून पैसा राजभवनात जमा न करता किरीट सोमय्या यांनी तो आपल्या निवडणुकीसाठी वापरला असल्याने राष्ट्रवादाचे तथाकथित राजकारण करणाऱ्या भाजपाने देशद्रोही सोमय्याची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, दौंड शहर प्रमुख आनंद पळसे, जिल्हा महिला व बालकल्याण समिती सदस्य स्वाती ढमाले, महिला आघाडीच्या छाया जगताप, कामगार सेना तालुका प्रमुख चांदभाई शेख, शिवसेना उपतालुका प्रमुख नवनाथ जगताप, अमोल काळे, विभाग प्रमुख हनुमंत निगडे, अजित फुटाणे, पांडुरंग काळभोर, रामदास काळभोर, मिथुन राठोड शिवसेना शहर समन्वयक अजय कटारे,शिवसेना शाखाप्रमुख हनुमंत भांडवलकर शिवसेनेचे प्रसाद कदम, चेतन लवांडे व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment