#Yavat:भारतीय संविधान हे जगातील सर्वात महान - प्रा.योगेश गदादे
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
" भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान ही जगातील सर्वात महान निर्मिती आहे.लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या या राज्यघटनेवर संपूर्ण भारताची न्यायव्यवस्था चालते ",असे प्रतिपादन राहू येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख सा. प्रा.योगेश गदादे ह्यांनी केले. ते येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयामध्ये झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या १३१व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दि (१३)रोजी खुटबाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ' भारतीय संविधान ' ह्या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.
याचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना, इतिहास विभाग आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ह्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर हे होते.यांनी मार्गदर्शन केले.ह्या व्याख्यानास भैरवनाथ शिक्षण मंडळाचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब ढमढेरे व संचालक अरुण थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्याख्यानाच्या प्रारंभी भारतीय संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. स्वागत आणि प्रास्ताविक सा.प्रा. डॉ. मल्हारी मसलखांब यांनी केले, वक्त्यांचा परिचय सा. प्रा. श्वेता ओव्हाळ यांनी करून दिला, आभारप्रदर्शन सा.प्रा.निखिल होले यांनी केले .
Comments
Post a Comment