#Yavat:माजी विद्यार्थ्यांकडून केलेल्या कामाचे नागेश्वर विद्यलयाला लोकार्पण
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
रयत शिक्षण संस्थेचे नागेश्वर विद्यालय व कै मधुकरराव गंगाजीराव शितोळे उच्च माध्य. विद्यालय पाटस मध्ये दहावी बॅच १९८८ ने ३ लाख रुपये खर्च करुन रविवार दि (३)रोजी ५०० स्क्वेअर फुट व्हरांडा बांधुन दिला या कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागिय अधिकारी किसन रत्नपारखी साहेब,संस्थेचे जनरल बॅाडी सदस्य नामदेवनाना शितोळे,स्कुल कमिटी सदस्य योगेंद्रबाबा शितोळे व सितारामतात्या भागवत,सरपंच सौ.अवंतिकाताई शितोळे,सत्वशिलभाऊ शितोळे,प्रशांततात्या शितोळे,छायाताई भागवत,मेमाणे सर आणि १९८८ बॅचचे सर्व माजी विद्यार्थी व रयत सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.
संस्था पदाधिकारी,ग्रामस्थ,माजी विद्यार्थी,पालक व सर्व सेवक हीच प्रत्येक शाळेची सर्वात मोठी ताकद असते. हे
१९८८ बॅचचे दाखवून दिले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment