#Chiplun:रत्नागिरी राष्ट्रवादीच्या महिलांकडून महागाई विरोधात आंदोलन
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात रविवार (दि.२९) रोजी चिपळूण येथील तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यानंतर महागाई संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार शेजाळे यांनी तहसीलदार यांच्यातर्फे निवेदन स्विकारले.
दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. खाद्यतेल, कडधान्य, गॅस, पेट्रोल-डिझेल आदी सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत चालले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटानंतर सावरत चाललेल्या जनतेला दिलासा मिळण्याऐवजी दरवाढीच्या संकटाने हैराण केले आहे. 'उत्पन्न कमी आणि खर्च जास्त' अशी त्यांची अवस्था झाली आहे. यासाठी मोदी सरकारलाच जबाबदार धरत रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार अर्थात मोदी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करत घोषणा देण्यात आल्या. तसेच यासंदर्भात तहसिलदार यांना निवेदनही देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे चिपळूण - संगमेश्वर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या सोबत कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा अर्चना घारे, जिल्हा निरीक्षक संगिता साळूणके, रत्नागिरी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष अंजली बेकर, काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष रवीना गुजर, माजी सभापती पुजा निकम, जिल्हाउपाध्यक्षा सिमा चाळके, महिला रत्नागिरी शहराध्यक्ष नेहाली नागवेकर, रत्नागिरी अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष सायमा काझी, युवती जिल्हाध्यक्ष दिशा दाभोळकर, चिपळूण शहराच्या अध्यक्ष दीपिका कोतवडेवर, तालुकाध्यक्षा जागृती शिंदे, जिल्हा सदस्य ऊषा पवार, रेहमत जबले, छाया माने, जिल्हा परिषद सदस्य मीनल कानेकर, गुहागर तालुकाध्यक्ष स्नेहा भागडे, माजी नगराध्यक्ष रीहाना बिजल, अनिता पवार, शहर उपाध्यक्ष समिना परकार, श्वेता महाडीक, मानसी कदम, वैशु काटदरे, चांदे मॅडम, कुंभार मॅडम आदि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment