#Yavat:यवत येथील पुणे सोलापूर महामार्ग वरील लोखंडी कंपाउंड मुळे नागरिकांना नाहक त्रास
रस्ता रुंंद करण्यामुुुळे वाहतूक सुलभ आणि सुरळीत होते, येथे झाले उलट या महामार्गाचे कामामुळेच यवत करांची कायम कोंडी झाली असून रोजच यातना सहन लागत आहेत.
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
पुणे -सोलापूर या मार्ग क्रमांक ६४ चे चौपदरी काम करून १० एक वर्षं झाली आहेत, मात्र सोलापूर हायवेवर येण्यासाठी वा यवत गावात जाणाऱ्या ठिकाणी चौक ठेवणे सुलभ व सोयीचे असताना नेमका येथेच रस्ता ला बंद केले आहे,
या प्रमुख चौकाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस भक्कम लोखंडी संरक्षक कठडे बांधले आहेत, यामुळे यवत गावात जाण्यासाठी पश्चिमेस १ कि, मि, भुलेशवर फाटा किंवा पूर्वेस कालव्याच्या पुलकडून १ की,मी,वळसा घालून यवत गावात जाण्यासाठी हा द्राविडी प्राणायम घालावा लागत आहे, वास्तविक ही जाणीव पूर्वक रस्ते खात्याने यवत साठी हा अडथळा निर्माण केला असून ती याची येथे प्रचंड चीड आहे, यवतच्या पश्चिम गावात प्रशस्त चौक व यवतचे कोंडी, हा थांबले पाहिजे,
रस्ते विभागाने येथे पुन्हा पाहणी करून येथे प्रशस्त चौक अलीकडे पलीकडे जाण्यासाठी त्वरित निर्माण करणं जनतेच्याया सहन शक्तीचा अंत पाहू नये अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
यवत करांची रोजच कोंडी होत आहे , हा प्रश्न गंभीर आहे लोकांचा त्रासदायक प्रश्न आहे, विशेष बाब म्हणजे याकडे कोणीही गांभीर्याने पहात नाही, लोकांना मात्र रोजच त्रास सहन करावा लागत आहे
Comments
Post a Comment