#Natepute:गणेश भोकरे यांचे विविध मागण्यांसाठी धर्मपुरी येथे उपोषण
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष
महादरबार न्यूज नेटवर्क -
सोलापूर जिल्ह्यातील जिल्ह्याच्या सरहद्दीवरील गाव धर्मपुरी तालुका माळशिरस येथील रहिवासी श्री गणेश रामचंद्र भोकरे हे ग्रामपंचायत हद्दीतील विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धर्मपुरी येथे दिनांक ३०/५/२०२२ रोजी सकाळी ११ वाजले पासून आमरण उपोषणास बसले आहेत .
आमरण उपोषणाचे मुद्दे
धर्मपुरी जिल्हा परिषद केंद्र शाळा जागा खरेदी व बांधकाम बाबत ,सार्वजनिक विहीर व पाईप लाईन, गावठाण हद्द वाढ,सिटीसर्वे प्रमाणे अंतर्गत रस्ते खुले करणे, व्यापारी गाळे बाबत ,स्मशानभूमी रस्ते, दोन्ही ओढ्याची हद्द कायम करणे, लोखंडी पुलाच्या जागेवर दगडी पुलाबाबत, जुने आड दुरुस्ती व वापर करणे बाबत बस स्थानक बांधकाम व जागेबाबत ,धर्मपुरी येथे बँक ऑफ इंडिया मिनी बँक शाखा होणेबाबत, वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या पत्रानुसार कारवाई होणेबाबत ,ग्रामपंचायत ठिकाणी ग्रामसचिवालय होने बाबत इत्यादी मागण्यांसाठी ते उपोषणास बसले आहेत.
भोकरे यांनी आपण आमरण उपोषण करत असल्याचे पत्र माहितीस्तव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,ग्रामविकास मंत्री ,जिल्हाधिकारी सोलापूर ,मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर, पोलीस अधिक्षक सोलापुर ,पोलीस अधिकारी अकलूज, उपविभागीय अधिकारी अकलूज, गटविकास अधिकारी माळशिरस, भूमी अभिलेख अधीक्षक माळशिरस, तहसीलदार माळशिरस, पोलीस निरीक्षक नातेपुते, मंडळ अधिकारी नातेपुते, तलाठी धर्मपुरी ,ग्रामसेवक धर्मपुरी ,पोलीस पाटील धर्मपुरी ,तंटामुक्ती अध्यक्ष धर्मपुरी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, मोरोची, यांना माहितीस्तव पाठवले आहे.
Comments
Post a Comment