Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun:लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश


चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील शिरगाव-वेताळवाडी, रिक्टोली तालुका चिपळूण तसेच कळंबुशी तालुका संगमेश्वर या  ३ पाझर तलाव यांना  सुमारे १४४ कोटी चा निधी मंजूर

महादरबार न्यूज नेटवर्क  - विलास गुरव
कोकणात मुसळधार पाऊस पडून देखील पाण्याचा साठा होत नाही परिणामी पाण्याची भीषण टंचाई ला  नागरिकांना तोंड द्यावे लागते. ही  परिस्थिती लक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांनी सुरवातीपासूनच पाण्याचे साठवण व्हावी हे उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेऊन, मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री यांचेकडे कोकणात मोठ-मोठ्या धरणांपेक्षा छोट्या-छोट्या पाझर तलावांच्या निर्मितीतून पाण्याचा साठा झाला पाहिजे  यादृष्टीने पाठपुरावा चालु केला आहे. त्या दृष्टीने एक पाऊल पुढे गेले आहे. 

शिरगांव पाझर तलावासाठी सुमारे  ६९कोटी, रिक्टोली पाझर तलावासाठी ५५ कोटी, कळंबुशी पाझर तलावासाठी २० कोटी अशी सुमारे  १४४कोटीच्या कामांना मंजुरी मंत्री महोदय यांनी दिली आहे.आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री  मा. ना. उद्धवजी ठाकरे, उप-मुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार,महसूलमंत्री बाळा साहेब थोरात, तसेच विशेष आभार  जलसंधारण मंत्री  मा. ना. शंकरराव गडाख साहेब यांचे  मानले आभार मानले.

Post a Comment

0 Comments