Hot Posts

6/recent/ticker-posts

#Tuljapur:काक्रंबावाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी


महादरबार न्यूज नेटवर्क - 
दिनांक ३१ मे रोजी काक्रंबावाडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य असते तो आपल्या स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. हा संपूर्ण विश्वाला संदेश देणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारत देशामध्ये मंदिर, तलाव यांचा जीर्णोद्धार केला. धर्माचे आणि मंदिरांचे आणि हिंदवी स्वराज्याचे प्राण पणाला लावून रक्षण केले. अस म्हणतात ज्या समाजाची स्त्री पुढे असते त्या समाजाला कधीही भिकेचे डोहाळे लागत नाहीत.

काक्रंबावाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी काक्रंबावाडी येथील भ्रष्टाचार निर्मुलन समिती अध्यक्ष महेश बजरंग कोळेकर आणि राजमाता युवा प्रतिष्ठान चे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments