#Malshiras:वाघमोडे कुटुंबाचा गेली दोन वर्षा पासुन अनोखा उपक्रम
वाघमोडे परिवाराने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवल्या राख्या
बालचिमुच्या राख्या निघाल्या सिमेवर
महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस शहरातील वाघमोडे कुटुंबाच्या वतीने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी स्वतः राख्या तयार करून रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक स्तुत्य उपक्रम नुकताच राबवला आहे. गेली दोन वर्षा पासुन हा उपक्रम राबविला जात आहे . स्वतः हाताने तिरंगा कलर मध्ये राख्या तयार करून देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबापासून दूर राहून सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना त्यांच्या बहिणीची उणीव भासू नये या हेतूने राख्या व शुभेच्छा पत्र पाठवले. या उपक्रमाचे उद्घाटन डॉटर्स अँड मॉम्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते व एपीआय नितीन घोळकर ,वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे ,भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास, स्वाभीमान ही वस्तूस्थिती येथील नागरिकांना कळायला हवी. मुलांमध्ये देखील देशभक्ती रुजायला हवी, यासाठी वाघमोडे कुटुंबाच्या वतीने
राखी सैनिकांसाठी' हा उपक्रम राबवून सुमारे दोन आठवड्यापासून राख्या तयार करून राख्या व शुभेच्छा पत्र पोस्टाद्वारे पाठविण्यात आले आहेत.
सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सणं-उत्सव होतात, याची माहिती असली तरी देशबांधवांच्या संरक्षणाचे भान, कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात. वाघमोडे कुटुंबीयांनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेल.
सैनिक युद्धांसह नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीतही देशवासीयांना मदत करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम घेतला. वाघमोडे कुटुंबाच्या वतीने शोभा वाघमोडे व त्यांची मुले अहिल्या ,तृप्ती,संयोगीता,भार्गवी,यशवंती व हार्दिक यांनी स्वतः राखी तयार केल्याने त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळाला.
माळशिरस येथे बोलताना , आपण राखी कशासाठी बांधतो तर भावाने आपले रक्षण करावे म्हणून आपल्या रक्षणात राखी बाधायची असते पुढे ही त्यांनी रक्षण करावे .आजच्या युगात भाऊ रक्षण करतो कि नाही माहीत नाही पण सिमेवर असलेला जवान हाच खरा आपला रक्षण कर्ता आहे. कोणत्याही परस्थीतीत देशाच्या प्रत्येक नागरीकांचे रक्षण करणे हि त्यांची जबाबदारी असते . म्हणून प्रत्येक बहीनीने सैनिक भावासाठी राखी पाठवावी . असे डॉटर्स अँड मॉम्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या .
यावेळी वैद्यकीय अधीक्षक स्मिता शिंदे , कार्यलयीन अधीक्षक भाग्यश्री बेडगे , रत्नमाला सिदवाडकर ,माजी सैनिक मारुती वाघमोडे, मनसे अध्यक्ष सुरेश टेळे, दत्तात्रय वाघमोडे,माळशिरस मेडिकल असोसिएशनचे प्रकाश आंबूडकर, मकरंद कुदळे,सचिन गाडेकर,तानाजी वाघमोडे तसेच पत्रकार गहिनाथ वाघंम्बरे,एल डी वाघमोडे, श्रीनिवास कदम पाटील, संजय हुलगे,तानाजी वाघमोडे ,भाजपा सरचिटणीस संजय देशमुख तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास कदम पाटील यांनी केले तर आभार तानाजी वाघमोडे यांनी मानले .
Comments
Post a Comment