महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या निरीक्षक पदाची नियुक्ती माजी आमदार तथा महिला अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी जाहीर केली. रायगड निरीक्षक पदी सुजाता तांबे, रत्नागिरी निरीक्षक पदी दर्शना बाबरदेसाई आणि सिंधुदुर्ग निरीक्षक पदी पूजाताई निकम यांची नियुक्ती करण्यात आली.
संसदरत्न खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राणी पार्वतीबाई हायस्कूल व जुनिअर कॉलेज सावंतवाडी या विद्यालयात विद्यालय व अर्चना फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवतीसाठी आरोग्य आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी युवतीना आरोग्य व करिअर विषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमावेळी निरीक्षक पदी नियुक्ती दिलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना निरीक्षक पदाचे नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या निरीक्षक आणि अर्चना फॉउंडेशनच्या उपाध्यक्षा मा. अर्चना घारे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.
याप्रसंगी सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा मा. रेवती राणे मॅडम, सावंतवाडी तालुकाध्यक्षा मा. रिद्धी परब मॅडम, सावंतवाडी जिल्हा सचिव रंजना निर्मल मॅडम, सायली दुवारमी मॅडम, सावली परकार मॅडम, दर्शना बाबरदेसाई मॅडम, नगरसेविका अफरोज राजगुरू मॅडम, बँक संचालिका प्रज्ञाताई परब, महिला प्रदेश सचिव नम्रता कुबक मॅडम, संगमेश्वर माहिला तालुकाध्यक्षा दुर्वाताई वेल्हाल मॅडम उपस्थित होत्या. प्रसंगी पक्ष बळकट व मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय, धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांचे सहकार्य राहील असा सर्वांनी विश्वास दिला.
या दौऱ्यावेळी वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर संचालित वि. स. खांडेकर सावंतवाडी या शाळेला भेट दिली व शाळेच्या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी रा. काँ. पा. च्या शिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक सौ. पुजाताई निकम, सावंतवाडी जिल्हा निरीक्षक सौ. अर्चना घारे मॅडम, रत्नागिरी जिल्हा निरीक्षक दर्शना बाबर मॅडम आणि सावंतवाडी तालुका महिला पदाधिकारी आणि शाळा शिक्षक वृंदासमवेत वृक्ष लागवड केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय सावंतवाडीला सौ. पूजाताई निकम यांनी भेट देऊन तेथील आढावा घेतला. प्रसंगी मा. अर्चनाताई घारे मॅडम आणि इतर महिला पदाधिकारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments