#Satara:टायर व बॅटऱ्या चोरणारी टोळी दहिवडी पोलिसांकडून जेरबंद
९लाख ३० हजार रुपये किमतीच्या टायर व बॅटऱ्या केल्या जप्त
महादरबार न्यूज नेटवर्क - एकनाथ वाघमोडे
गेल्या काही दिवसांपासून दहिवडी सह परिसरात मोठ्या गाड्यांच्या बॅक्ट्रिया व टायर चोरणाऱ्या टोळीला दहिवडी पोलिसांनी अखेर जेरबंद केले यामध्ये त्यांच्याकडून दहिवडी पोलिसांनी एकूण ९ लाख व ३० हजार रुपये च्या टायर व बॅटऱ्या जप्त केलेले आहेत.
दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी परराज्यातील असून गेले कित्येक दिवस दहिवडी सह परिसरात मोठ्या गाड्यांच्या बॅटऱ्या चोराजकीयणे त्याचबरोबर टायर चोरून त्याची विक्री करणे अशी कामे करत होती.
दहिवडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत बिजवडी येथील एका ट्रकचा टायर बॅटरी काही अज्ञात युवकांनी चोरून आयशर टेम्पोच्या माध्यमातून पळवल्याची माहिती दहिवडी पोलिसांना दिली. या माहितीला दहिवडी पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद देऊन बिजवडी ग्रामस्थांच्या सहकार्याने पाठलाग करुन त्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले. त्याचबरोबर प्राप्त तांत्रिक माहितीवरून व तपास कौशल्याचा वापर करून जितेंद्र रामसिंग धाकड वय 25 वर्षे तसेच दीपक कैलास धाकड वय 19 वर्षे( दोघे रा.मोहना, ता.घाटेगाव, जि. ग्वाल्हेर-मध्यप्रदेश) यांना मोगराळे गावच्या हद्दीत पाठलाग करून शिताफीने पकडले. सांगली जिल्ह्यातील अनेक गाड्यांच्या बॅटर्या व टायर चोरीच्या घटना दहिवडी पोलिसांच्या या कारवाईमुळे उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे दहिवडी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल ,अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवडी विभाग डॉ.निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर पोलीस उपनिरीक्षक तुपे सहाय्यक पोलीस फौजदार पी.जी. हांगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल एस. एन. केंगले, पोलीस नाईक आर.पी.खाडे ,आर. एस.बनसोडे,ए. एच. नदाफ, टी.एम.हांगे व के आर बर्गे यांनी केली.
Comments
Post a Comment