Hot Posts

6/recent/ticker-posts

#Pune:वनाझ परिवार विद्या मंदिर, कोथरूड शाळेत 'जागतिक योगदिन' साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क  - विलास गुरव 
वनाझ परिवार विद्या मंदिर कोथरूड पुणे या शाळेत जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या. योगप्रशिक्षक सौ.मंजिरी कंटक या उपस्थित होत्या. त्यांनी त्यांच्या मनोगतात योगासनाचे महत्त्व पटवून दिले.अभ्यासूवृत्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी योगासनाची कशी मदत होते.हे सांगितले.व प्रात्यक्षिक करून दाखवले. 

तसेच शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.अनिताताई दारवटकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.आजच्या योग दिनाच्या दिवशी इ.३री ते ५वी च्या विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सौ.संगीता चव्हाण व दीपक राऊत या शिक्षकांनी केले.

आज योग दिनाच्या दिवशी सौ.  अर्चना जाधव यांनी योग केल्यामुळे आरोग्य कसे निरोगी राहते.व योग दिनाची माहिती सांगितली.
 तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. काजल मेणे व आभार सौ.सुनीता जपे या शिक्षकांनी केले.
 अशाप्रकारे हा कार्यक्रम चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडला.

Post a Comment

0 Comments