#Yavat:कासुर्डी टोल ते लोणी काळभोर टोल महामार्ग दुरुस्त करा
अखिल भारतीय मराठा महासंघाचे निवेदन
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
कासुर्डी टोल नाका ते लोणी काळभोर टोल नाका पुणे सोलापूर हायवे सदर महामार्गावर सध्या खड्डे, टोलनाक्यावरील स्पीड ब्रेकर,सहजपुर फाट्यानजीक खड्डे, महामार्ग व सर्विस रोड यांच्यामधील तुटलेल्या जाळ्या, रोडच्या कडेला पडलेली माती,वाळू व काटेरी झुडपे यांच्यामुळे वाहन चालवणे धोक्याचे झाले आहे. कधीही भीषण अपघात होऊ शकतो,सद्यस्थितीला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा या महामार्गावरून जात आहे, महामार्गावर दुतर्फा काटेरी झुडपे रस्त्याच्या मधोमध डीवाईडर वर उगवून आलेले आहेत, तसेच वाळू व मातीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच कासुर्डी टोल नाक्यावर पुण्यावरून सोलापूर च्या दिशेला जाताना खूप मोठे खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी बसवण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या तुटलेली आहेत त्याचे लोखंडी गज बाहेर निघालेले आहेत. डिवायडर च्या मध्ये माती, रस्त्याच्या बाजूला माती साचलेली आहे.भाविकांच्या आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. प्रशासन कोणाचा बळी जायची वाट पाहत आहे का? भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण NHAI यांच्या मार्फत संपूर्ण डागडुजी व दुरुस्तीचे काम पालखी सोहळा यवतला येण्याअगोदर करावा. अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा करीत आहे. अन्यथा एक दिवसाचे उपोषण आम्ही मराठा महासंघाच्या वतीने टोलनाक्यावर करू. वरील सर्व मागण्यांचा विचार करावा ही नम्रतेची विनंती व दोन दिवसांमध्ये कार्यवाही सुरू व्हावी.
सदर निवेदन देताना मराठा महासंघाचे राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे,अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष मयूर सोळसकर, जिल्हा संपर्कप्रमुख युवराज थोरात, जिल्हा उपाध्यक्ष तुषार शेळके, मराठा महासंघ पुणे शहर पदाधिकारी मयूर गुजर, शांताराम मनवरे, दौंड तालुका मराठा महासंघाचे पदाधिकारी प्रदीप भोंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment