#Malshiras:महिलेवर जबरदस्तीने धमकावून बळजबरीने अत्याचार (बलात्कार )व मारहाणीचा आरोप असणाऱ्या बब्रुवान प्रमोद मलमे यास माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मंजूर
मे. कोर्टाने आरोपींच्या जामीन अर्ज वरती बचावासाठीचा युक्तिवाद मान्य करून अटी व शर्तीच्या अधीन राहून जामीन अर्ज मंजूर केला.
आरोपीचे वकील
ॲड. प्रशांत रुपनवर.
महादरबार न्यूज नेटवर्क -
जबरदस्तीने धमकावून बळजबरी अत्याचार व मारहाण केलेल्या चा आरोप असणारे आरोपी बब्रुवान प्रमोद मलमे लवंग शेक्शन याचेवर अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला होता. सदर आरोपीच्या बाजूने बचावासाठी युक्तिवाद ॲड प्रशांत रुपनवर यांनी न्यायालयात केलेला होता. सदर आरोपीचा बचावासाठीचा युक्तिवाद मेहरबान कोर्टाने मान्य करून अटी व शर्तीच्या आधीन राहून आरोपीस जामीन मंजूर केला आहे.
हकीगत अशी अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 0369 दिनांक 22/05/2022 रोजी बब्रुवान प्रमोद मलपे लवंग सेक्शन तालुका माळशिरस यांच्यावर भारतीय दंड संहिता 1960 कलम 376, 366, 327 ,323 ,504 ,506 प्रमाणे गुन्हा नोंद झालेला होता.
सदर गुन्ह्यांमध्ये आरोपीने ओळखीचा फायदा घेऊन बळजबरीने अत्याचार करून दुसऱ्या तालुक्यामध्ये घेऊन जाऊन आरोपीच्या ओळखीच्या ठिकाणी पंधरा दिवस ठेवून जबरदस्तीने व बळजबरीने शरीर संबंध करत असत प्रतिकार केल्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत असेल माझ्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र दागिने जबरदस्तीने काढून घेतलेले आहेत. अशा आरोपाची फिर्याद अकलूज पोलीस स्टेशन येथे दिलेली होती. अकलूज पोलीस स्टेशन तपास अधिकारी यांनी सदर आरोपीस अटक केलेली होती. न्यायालयात जामिनासाठी आरोपीच्या बाजूने युक्तिवाद ॲड प्रशांत रुपनवर यांनी मांडलेला होता.या कामी ॲड मनोज जाधव,ॲड.सागर रुपनवर ॲड. ज्ञानदेव कचरे,ॲड. जयसिंग कचरे,ॲड.धनंजय सर्जे यांनी काम पाहिले
जिल्हा व सत्र न्यायालय माळशिरस नियमित जामीन अर्ज क्रमांक 226 20 22 दिनांक 15/ 07 /20 22 रोजी निकाल दिला.
आरोपीस माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मंजूर झाला .
Comments
Post a Comment