#Yavat:उंडवडी मध्ये स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सवी कार्यक्रम अतिशय अनोख्या उपक्रमांनी साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -  संतोष जगताप
ग्रामपंचायत उंडवडी येथे पंचायत समिती दौंड व जिल्हा परिषद पुणे  यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र्यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम  कृषी अधिकारी श्री.झरांडे , प्रशासन अधिकारी कुंभार साहेब, कृषी विस्तार अधिकारी ढोले साहेब , यांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातील स्वछता अभियान तसेच आरोग्यविभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी , बूस्टर डोस लसीकरण त्याचबरोबर गावातून प्राथमिक शाळेतील मुलांची स्वच्छता दिंडी काढण्यात आली. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत उंडवडी च्या वतीने घनकचरा व्यवस्थापण शेडचे उद्घाटन करण्यात आले. 

देश सेवा केलेल्या सैनिकांचा नागरी सत्कार करण्यात आला आणि पशुसंवर्धन विभागा तर्फे गावातील जनावरांना जंत नाशक गोळ्या ,औषधे देण्यात आली गावातील ७५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांना पंचायत समिती मार्फत प्रत्येकी एक केशर आंब्याचे झाड वाटप करण्यात आले त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या मुलांनी भाषणे केली. मुलांनी विविध स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा यांचे उत्तम सादरीकरण त्यासाठी बक्षीस रुपी शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले तसेच उंडवडी भोसले वाडी या ठिकाणी पक्षांच्या ज्युस बार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी उंडवडी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सौ. दिपमाला सतीश जाधव ,विद्यमान  उपसरपंच  विकास सुभाष कांबळे,  ग्रामपंचायत सर्व सदस्य , आजी माजी पदाधिकारी ग्रामसेवक जाधव साहेब , चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक सोसायटी , शिक्षक , मुले ,कर्मचारी , ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष  दिनेश गडदे आणि विद्यमान उपसरपंच विकास कांबळे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम