#Natepute: “ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची येथे जवानांच्या हस्ते ध्वजारोहण”
महादरबार न्यूज नेटवर्क -
मोरोची तालुका माळशिरस येथील ‘दर्या प्रतिष्ठान’ संचलित डॉ. निटवेज “ ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल , मोरोची” या शाळेत आज सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्य दिन दिमाखात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोरोची परिसरातील जवानांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर विद्यालयातील रायफल परेड चे विद्यार्थी प्रमुख पाहुणे यांना ध्वजारोहण करण्यासाठी घेऊन आले. प्रमुख पाहुणे जवान श्री. सुनिल खांडे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी भारतीय सैन्यात सेवा बजावणारे इतर ही जवान उपस्थित होते.यामध्ये श्री. दादा कुमकले सर , श्री.अशोक राऊत सर, श्री.नितिन सुळ सर, श्री.गणेश महानवर सर व सर्व मान्यवर, पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थित ध्वजारोहण करण्यात आले.नंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हाऊस वाईज बॅन्ड च्या तालावर दिमाखदार संचलन सादर केले.
यानंतर विविध कलागुण सादर करण्यात आले.
यामध्ये देशभक्ती पर गीत गायण व नृत्य सादरीकरण करण्यात आले. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांची देशभक्ती पर सुंदर अशी भाषणे झाली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे प्राचार्य यांनी स्वातंत्र्य सेनानी यांचे बलिदान आपण कधिही विसरु नये असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील हेड बॉय आविष्कार झेंडे, क्लास मॉनिटर श्रेया सावंत आणि हेड गर्ल प्रांजली मोहिते यांनी केले.
सदर कार्यक्रम विद्यालयाचे प्रिन्सिपल ताहेर शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी साजरा केला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. दत्तात्रय निटवे सर, सेक्रेटरी डॉ.योगिता निटवे मॅडम , संचालक आप्पासाहेब शेंडगे प्रमुख पाहुणे ,आर्मी ऑफिसर व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment