#Indapur:विधानसभा व लोक सभेसाठी ५० टक्के आरक्षण मिळवण्यासाठी खंबीरपणे महिलांच्या पाठीशी उभे राहू - डॉक्टर वर्षा शिवले
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश चिटणीस पदी डॉ. वर्षा शिवले यांची एक मताने निवड
महादरबार न्यूज नेटवर्क - बाळासाहेब सुतार
वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या डॉ. वर्षा शिवले यांची नुकतीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली . राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी डॉ. वर्षा शिवले यांना नियुक्तीचे पत्र दिले .
वढू बुद्रुक येथील डॉ. शिवले या राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ आसून यापूर्वी तालुका अध्यक्ष, शासकीय समिती सदस्य, अहमदनगर जिल्हा निरीक्षक, पुणे जिल्हा बँकेचे संचालकपद भूषवित पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवली आहेत, काही दिवसांपूर्वी त्यांनी नुकतेच शरद पवार यांच्यावर आधारित ॲग्री विथ कल्चर हे पुस्तक छापले आहे, डॉ. शिवले यांच्या कार्याची दखल घेत त्यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती केली , तर निवडी नंतर बोलताना वर्षा शिवले म्हणाल्या की शरदचंद्र पवार साहेबांच्या प्रयत्नामुळे अनेक महिलांना उच्च पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. सामाजिक धोरणामुळे महिलांना सन्मान मान व प्रतिष्ठा मिळालेली आहे. महिला अतिशय उत्कृष्टरित्या स्वतः आपली कामगिरी बजावत आसल्यामुळे महिलांना इथून पुढे विधानसभा व लोकसभेत ५० टक्के आरक्षण मिळाले पाहिजे अशी आग्रहाची भूमिका मांडणार आहे. असे उदगारर डॉक्टर वर्षा शिवले यांनी निवडी प्रसंगी केले.
देशाचे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष मजबूत व बळकट करणार आहे. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी महिलांना ५० टक्के आरक्षणाची मागणी करणार असल्याचे डॉ. शिवले यांनी सांगितले.
Comments
Post a Comment