#Baramati:ग्रामीण भागातील झारगडवाडीत प्रथमच पार पडणार दहीहंडीचा उत्साह..
दहीहंडी निमित्त सोमवारी झारगडवाडीत सिनेतारकांचा पाहायला मिळणार जलवा..
महादरबार न्यूज नेटवर्क - नवनाथ बोरकर
गोकुळाष्टमीचा उत्साह मोठ्या उत्साहात देशभर, आणि राज्यभर पार पडत आहे. राज्यामध्ये सर्वात मोठ्या दहीहंड्या ह्या मुंबई, पुणे या शहरांमध्ये पार पडत असतात मात्र आता शहरांबरोबरच ग्रामीण भागात देखील गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा उत्साह मोठ्या जल्लोषात पार पडत आहे.
बारामती तालुक्यातील झारगडवाडीत पहिल्यांदाच दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सोमवारी ( ता.22 ) सायंकाळी दहीहंडीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या दहीहंडी साठी झारगडवाडीत रान बाजार फेम माधुरी पवार आणि गोल्डन गर्ल सुवर्णा काळे या दोन अभिनेत्रींना आमंत्रित करण्यात आले आहे यामुळे ग्रामीण भागातील झारगडवाडी मध्ये दहीहंडी निमित्त सिनेतारकांचा जलवा पाहायला मिळणार आहे.
या दहीहंडी मुळे ग्रामीण भागातील महिलांना देखील दहीहंडी पहाण्याचा आनंद मिळणार आहे. दहीहंडी निमित्त झारगडवाडीत बिकेबीएन रस्त्याच्या दोन्ही बाजूला गोपाळ भक्तांना शुभेच्छा असे बॅनर झळकले आहेत. या दहीहंडीचे आयोजन जनहित युवा प्रतिष्ठान झारगडवाडी आणि पार्थ दादा युथ फाउंडेशन झारगडवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment