#Baramati:झारगडवाडीत प्रथमच दहीहंडीचा उत्सव..

दहीहंडीला झारगडवाडी व पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उपस्थिती.. 

महादरबार न्यूज नेटवर्क - नवनाथ बोरकर
गोकुळाष्टमी निमित्त झारगडवाडीत ( बारामती ) दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी  गोल्डन गर्ल सुवर्णा काळे, आणि रानबाजार फेम माधुरी पवार या सिनेतारकाच्या नृत्यावर तरूणाई अक्षरशः बेधुंद होत थरकली. झारगडवाडीत प्रथमच दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला होता यात पार्थदादा युथ फाउंडेशन ची 55 हजार 555 रुपयांची दहीहंडी अभिनव दहीहंडी संघाने फोडली तर जनहित युवा प्रतिष्ठानची 51 हजारांची हंडी जय मल्हार दहीहंडी संघाने फोडली. यावेळी नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले. 

यावेळी दहीहंडी उत्सवाला बारामती ऍग्रो चे चेअरमन राजेंद्र पवार, बा. न. पालिकेचे जेष्ठ संचालक किरण गुजर, बा. ता. अध्यक्ष संभाजी होळकर, सोलापूरचे  उपमुख्याधिकारी माणिकराव बिचकुले, परिवहन अधिकारी हेमंत सोलणकर,   सिद्धार्थ राजेकंग, मा. का. संचालक योगेश जगताप, बा. संजय गांधी योजनेचे माझी अध्यक्ष किरण तावरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत गावडे, पं. स. सदस्य राहुल झारगड, छ. कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, झारगडवाडी च्या सरपंच वैशाली मासाळ, झा. तंटामुक्ती अध्यक्ष गोरख बोरकर, ग्रा. सदस्य अजित बुरुंगले, वैष्णव बळी, पदमनाथ निकम, नितीन शेडगे, माझी सदस्य पोपट कुलाळ, युवा नेते प्रवीण बोरकर, अंकुश निकम, रमेश बोरकर, पार्थदादा युथ फाउंडेशन चे दहीहंडी संघाचे मार्गदर्शक राजेंद्र बोरकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यामध्ये सर्वात मोठ्या दहीहंड्या ह्या मुंबई, पुणे, सारख्या या शहरांमध्ये पार पडत असतात. राज्यात तीन दिवसापूर्वी दहीहंडीचा थरार पार पडला. मात्र आता शहरांबरोबरच ग्रामीण भागात देखील आता गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे.   बारामती तालुक्यातील झारगडवाडीत प्रथमच मोठ्या उत्साहात दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला या दहीहंडी निमित्त सिनेतारकांच्या नृत्यावर तरुणाई अक्षरशा बेधुंद थरकली, सिनेतारकांचा जलवा आणि गोविदाकडून फोडण्यात येणारी दहीहंडी  पाहण्यासाठी झारगडवाडी व पंचक्रोशीतील नागरिक व महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रथमच ग्रामीण भागातल्या झारगडवाडीत दहीहंडी उत्सव साजरा झाल्याने महिलांना दहीहंडीचा उत्सव पाहता आला. यामुळे विशेष करून महिलांनी दहीहंडी आयोजकांचे आभार मानले. 

पार्थदादा युथ फाऊंडेशन चे आयोजन बंटी बोरकर, रणजित बिचकुले, अक्षय आवटे, प्रमोद बोरकर यांनी तर जनहित युवा प्रतिष्ठानचे आयोजन झा. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बोरकर, अभिजित झारगड, सुनील लोखंडे, मयूर निकम यांनी केले होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम