#Varvand:ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या पदविकाधारक डॉक्टरांना कायदेशीर संरक्षण देण्यासंदर्भात शासनाने त्वरित कारवाई करावी - आमदार राहुल कुल
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
आज विधानसभेमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांनी लक्षवेधी सूचना मांडत असताना ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय पदविकाधारक डॉक्टरांच्या संबंधित प्रश्न उपस्थित केला. ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी पदविकाधारक डॉक्टरांची संख्या जास्त प्रमाणात आहेत. जे वाड्या वस्त्यांवर जाऊन पशुवैद्यकीय सेवा देत असतात. पदवीधारक आणि पदविका धारक असा वाद या राज्यामध्ये आहे. यासंदर्भात केंद्राच्या काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये बसून या पदविकाधारक डॉक्टरांना प्रॅक्टिस करत असताना ज्या अडचणी येत आहेत त्यासंदर्भामध्ये शासनाने वारंवार बैठका घेतलेल्या आहेत. परंतु त्याच्यामध्ये अजून काही मार्ग निघालेला नाही. पशुवैद्यक पदवी व पदविकाधारक यांच्यातील वाद सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. या पदविकाधारक डॉक्टरांना संरक्षण देण्यासंदर्भात मंत्री महोदय निर्णय घेतील का ? असा सवाल दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत उपस्थित केला.
या प्रश्नावर उत्तर देत असताना राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की सन्माननीय सदस्यांनी अतिशय चांगली सूचना केली आहे. अधिवेशन संपताच संबंधित आमदारांना घेऊन दोन्ही संवर्गातील मंडळीं बरोबर बैठक घेऊन या संबंधित योग्य तो मार्ग लवकरात लवकर काढण्याचे आश्वासन यावेळी दिले.
ग्रामीण भागातील पदविकाधारक पशुवैद्यकीय डॉक्टरांचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल पुणे जिल्हा पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ यांच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोष बडेकर यांनी दौंड आमदार राहुल कुल यांचे आभार मानले यावेळी दौंड तालुका अध्यक्ष राहुल ताकवणे, डॉ. विजय कुल, डॉ. प्रशांत शितोळे, डॉ. वाघमोडे उपस्थित होते.
Comments
Post a Comment