महादरबार न्यूज नेटवर्क - बाळासाहेब सुतार
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा ( घरोघरी तिरंगा ) अभियान राबवण्यात येत आहे. या देशप्रेमी अभियानामध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी परीसरातील शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत जनजागृती केली.
पिंपरी बुद्रुक ( ता.इंदापूर ) येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून नागरिकांमध्ये जनजागृती केली. यावेळी "वंदे मातरम" "भारत माता की जय" "हर घर तिरंगा" "घर घर तिरंगा" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तसेच नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शिवपार्वती इंग्लिश मीडियम स्कूल, माध्यमिक विद्यालय गिरवीच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, टनु, नरसिंहपूर, गिरवी, गोंदी, ओझरे, लुमेवाडी आधी ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीत सहभागी होऊन घोषणा देत जनजागृती केली. तर परिसरातील ग्रामपंचायत कार्यालयासह शासकीय कार्यालयावर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनजागृती फलके तयार करण्यात आली आहेत. गावोगावी याबाबत विविध प्रकारच्या माध्यमातून जनजागृती केली.
0 Comments