महादरबार न्यूज नेटवर्क - बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील स्वर्गीय कैलासवासी नागरभाभी तुळजीराम रजपूत यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिंडी प्रदक्षिणा संपूर्ण गावामध्ये करण्यात आली, भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाले. अमृत महोत्सव वर्ष भारत देशा मध्ये साजरा होत आसताना हर घर तिरंगा लावावा हा संदेश या माध्यमातून देण्यात आला. याप्रसंगी पिंपरी बुद्रुक गावातील भजनी मंडळ ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
तुळजीराम रजपूत, व त्यांचे कुटुंब,, नंदकुमार रजपूत, रामहरी रजपूत, यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज गुरुवर्य ह भ प बापूसाहेब महाराज देहुकर यांचे 10 ते 12 या वेळेत कैलासवासी नागरभावी रजपूत यांच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव करून कीर्तन सेवा संपन्न झाली. नीरा नरसिंह पूर परिसरातून अनेक वारकरी संप्रदायातील भाविक भक्त विणेकरी टाळकरी व भजनी मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला.
0 Comments