#Indapur:बावडा ते नरसिंहपुर परिसरात ७५ व्या स्वतंत्रच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध उपक्रम राबवून ध्वजारोहण उत्साहात करण्यात आले

महादरबार न्यूज नेटवर्क -  बाळासाहेब सुतार
बावडा ते निरा नरसिंहपुर, तालुका इंदापूर परिसरामध्ये भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र अमृत महोत्सवा निमित्त, या भागातील विद्यालये व ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी हार घर तिरंगा ध्वज शालेय साहित्य वह्या, पेन, विद्यार्थ्यांसाठी दप्तर,  शालेय गणवेश, खाऊ वाटप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. नरसिंहपूर, गिरवी, पिंपरी बुद्रुक, टणु , गोंदी ,ओझरे, लुुमेवाडी, गणेशवाडी, सराटी, बावडा,लिंबोडी, या भागामध्ये विविध उपक्रम राबवून हर घर तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. तर बावडा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया समोर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व बावडा ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सरपंच किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सराटी येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ या विद्यालयाच्या समोर पुणे जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या, आध्यक्षतेखाली माजी सैनिक नवनाथ कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पिंपरी बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालया समोर माजी सरपंच श्रीकांत बोडके यांच्या मार्गदर्शना खाली बाळासाहेब मगर यांनी झेंडा पूजन केले तर, सुभद्रा महादेव बोडके, व सरपंच ज्योती श्रीकांत बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये  माजी सरपंच आबासाहेब बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्या पुतळ्याचे पूजन माजी चेअरमन लालासाहेब बोडके यांनी केले. तर जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये सरपंच ज्योती श्रीकांत बोडके यांच्या हस्ते ध्वजा पूजन केले तर तात्या शेंडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  ओझरे येथील जिल्हा परिषद विद्यालयासमोर माजी सैनिक विलास रास्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गोंदी येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर सरपंच रणजीत वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली  सरपंच हिंदूमती वाघमोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गणेशवाडी येथील जिल्हा परिषद विद्यालया समोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गिरवी येथील ग्रामपंचायती समोर सरपंच पांडुरंग डिसले व उपसरपंच दादासाहेब शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पार्वती पांडुरंग डिसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, ,तर गिरवी येथील भैरवनाथ विद्या प्रतिष्ठान विद्यालयाच्या प्रांगणामध्ये रणजीत आशोक घोगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.टणु येथे सरपंच शितल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच राजकुमारी शितल मोहिते व सारिका दिलीप लावंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. लुमेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच पोपट बाबू जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

नरसिंहपूर येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर माजी सरपंच नरहरी काळे यांच्या अध्यक्षतेखाली
सरपंच अश्विनी चंद्रकांत सरवदे , सरपंच चंद्रकांत सरवदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर चैतन्य विद्यालय श्री सो गो दंडवते महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये श्रीकांत दंडवते यांच्या अध्यक्षतेखाली भाग्यश्री दंडवते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शिवपार्वती इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्राचार्य रविराज काकडे यांच्या मार्गदर्शना खाली विद्यालयाच्या प्रांगणामध्ये ग्रामपंचायत सदस्य आनंद काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

वंदे मातरम, भारत माता की जय, आशा घोषणा देत
75 व्या अमृत महोत्सवा निमित्त  तिरंगी ध्वजाला वंदन करून झेंडा गित , व राष्ट्रगीत म्हणून झेंड्याला सलामी  देण्यात आली. सर्वच ठिकाणी कवायती ही घेण्यात आल्या.
या कार्यक्रमा प्रसंगी संपूर्ण भागा भागातून गावोगावी विद्यालयाच्या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिक आजी माजी विद्यमान सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शासकीय पदाधिकारी सर्व शिक्षक वर्ग व  ग्रामस्थ आणि विद्यार्थी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव  दिन हा अतिशय उत्कृष्टरित्या या संपूर्ण परिसरामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने आनंदाने  साजरा करण्यात आला.

श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानच्या वतीने व देवस्थान अध्यक्ष  प्रमोद दंडवते यांच्या हस्ते व विश्वस्त अविनाश दंडवते, पोलीस पाटील आभय वांगकर यांच्या सहकार्याने 200 हुन अधिक गोर गरीब विद्यार्थ्यांना ‌देवस्थानचा महाप्रसाद म्हणून गणवेश व दप्तर देण्यात आले. 

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत