#Varvand:यवत येथे भारताचा ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन साजरा
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
यवत येथे भारताच्या ७५वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला विध्यार्थीची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीमध्ये स्वतंत्र भारताच्या घोषणा देत होते यावेळी सर्व शिक्षक वृंद कर्मचारी सहभागी होते विद्या विकास मंदीर येथे सरपंच समीर दोरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात
यावेळी पत्रकार तसेच स्वातंत्र्य माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. दहावीत प्रथम क्रमांक आलेली चेताली युवराज मेहताचा सन्मान करण्यात आला. विद्या विकास मंदिर व जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले विद्यार्थ्यांनी सुंदर देशभक्तीपर गाणी व नृत्य सादर केले तसेच हजरत बडे शहावली दर्ग्यातील विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर गीत झाले.
यानंतर ग्रामसभा घेण्यात आली यावेळी या कार्यक्रमास सरपंच समीर दोरगे तसेच उपसरपंच सुभाष बापू यादव, जि प सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्य निशा ताई शेडगे, माजी उपसरपंच सदा बापू दोरगे, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड तसेच ग्रामसेवक बबनराव वाखाले यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब, पोलीस उपनिरीक्षक माधुरी तावरे ,जेष्ठ पत्रकार एम,जी, शेलार, समीर सय्यद, उत्तम गायकवाड
विद्या विकास मंदिराचे प्राचार्य दादासो मासाळ व जि प शाळा१ व२ चे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
Comments
Post a Comment