#Indapur:तबला संगीत विशारद मध्ये ह भ प ओंकार गजेंद्र डांगे यांनी प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल महादेव सुतार यांच्या सहीत विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांच्या वतीने सन्मान

महादरबार न्यूज नेटवर्क - बाळासाहेब सुतार
गोंदी तालुका इंदापूर येथील शिवचरित्रकार व युवा कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वरी डांगे यांचे बंधू व ह भ प गजेंद्र डांगे यांचे चिरंजीव ह भ प ओंकार महाराज डांगे यांनी तबला संगीत विशारद ही परीक्षा दिली त्यामध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण  झाल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला . ह भ प संतोष महाराज कवडे सर (संगीत विशारद) यांच्या मार्गदर्शनाने  संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली. 

या निमित्ताने पिंपरी बुद्रुक भजनी मंडळ, ग्रामस्थ यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे त्यांचा सन्मान करण्यात आला विणेकरी ह भ प महादेव सुतार यांच्या हस्ते  सन्मान केला. यावेळी समस्त भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते ह भ प ओंकार महाराज डांगे यांनी पंचक्रोशी मध्ये प्रथमच संगीत कला क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक संपूर्ण भागामध्ये होत आहे. सूत्र संचलन ह भ प महेश सुतार यांनी केले व आभार  बाळासाहेब घाडगे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम