#Alandi:रिक्षात विसरलेली बॅग प्रामाणिकपणे परत केली

काळेवाडी (ता. हवेली): येथे रिक्षामध्ये विसरलेली व मौल्यवान वस्तू असलेली बॅग रंजनाताई मर्ढेकर यांना परत करताना पत्रकार एम.डी. पाखरे

महादरबार न्यूज नेटवर्क -
बदलापूर ( जिल्हा ठाणे) येथून श्रीक्षेत्र आळंदी येथे देवदर्शनासाठी आलेल्या रंजनाताई मर्ढेकर व त्यांच्या सहकारी यांनी आज मंगळवार दिनांक 13 रोजी दुपारी माऊलींचे मनोभावे दर्शन घेतले व येथून जवळच असलेली काळेवाडी (ता. हवेली) येथे असणाऱ्या आपल्याआईकडे जाण्यासाठी आळंदी नगरपरिषद चौकातून रिक्षा केली.

सदरची रिक्षा ही पत्रकार एम.डी. पाखरे  यांची सामाजिक कार्य करणारी म्हणजेच अंध अपंग मूकबधिर यांसाठी मोफत सेवा व इतर सर्व सुविधांसाठी कार्यरत आहे या त्यांच्या रिक्षांमध्ये आळंदी ते काळेकॉलनी प्रवासादरम्यान मर्ढेकर ताई यांची बॅग विसरून राहिली. त्यामध्ये मोबाईल, किमती वस्तू ,दाग दागिने ,व इतर महत्त्वाची कागदपत्रे आदी साहित्य होते, रस्त्यामध्ये पत्ता विचारण्यासाठी तेथील स्थानिक नगरसेवक अविनाश तापकीर यांच्याशी पत्रकार एमडी पाखरे यांनी संवाद साधून पत्ता कोणत्या ठिकाणी आहे याची खात्री  करून पुढील प्रवास केला मात्र घाईघाईत रंजनाताई मर्ढेकर या आपली बॅग तशीच विसरून उतरून गेल्या.

सदरील बॅग गाडीत विसरल्याचे पाठीमागे पाहिले असता लक्षात आले त्यानंतर अर्ध्या तासाने नगरसेवक अविनाश तापकीर यांच्या पत्नी शैलाताई अविनाश यांनी खातर जमा करण्यासाठी एम.डी. पाखरे यांना फोन करून संबंधित रिक्षामध्ये विसरलेल्या बॅगची खातर जमा करून एम.डी. पाखरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की संबंधितांची बॅग सुरक्षित आहे अवघ्या काही तासातच ती त्यांना घरी जाऊन परत केली जाईल असे सांगितले तदनंतर सायंकाळी सहा वाजता सदरील मर्ढेकर कुटुंबांच्या स्वाधीन केली.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम