#Yavat:यवत ला पुणे सोलापूर महामार्गावर उड्डाण पूल होणे गरजेचे !
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत येथे पुणे सोलापूर महामार्गावर दिवसेंदिवस अपघात वाढतच आहेत बऱ्याच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यवत येथे दूरच्या दिशेने लोकांना जाण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरनाणे एक भुयारी मार्ग तयार केली आहे . त्याच्यातूनच दोन चाकी चार चाकी वाहने जातात त्यामुळे त्या भुयारी मार्गतः गर्दी असते पावसाळ्यात भरपूर पाणी होते पाणी त्यामुळे लोकांना जाणे येण्यासाठी नाईलाज असतो एवढे मुख्य चौकातच जीवाशी खेळ करून रस्ता ओलांडावा लागतो आणि प्रचंड वाहतूक असल्यामुळे वाहने जोरात असतात वयस्कर तरुण लहान मुले गर्भवती स्त्रिया यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असतात परंतु प्राधिकरणाने यवतच्या नागरिकांनी वारंवार मागणी करत आहे. यवतला मुख्य चौकात उड्डाण पुल व्हावा हि नागरिकांची मागणी आहे दिवसेंदिवस यवत ची लोकसंख्या वाढत आहे पि.म.पी.एल यवतला सुरु झाली. त्यामुळे लोकसंख्या त वाढ होत आहे त्यामुळे पूल होणे गरजेचे आहे.
भुयारी मार्ग मुख्य रस्त्यापासून लांब असल्याने नागरिक यवत चौकातील रस्ता क्रॉस करतात. नागरिकाच्या जीवाशी खेळ होतो व अन पूर्वेकडून आले पश्चिमेकडे जा कुठून आले हे लोकांना समजतच नाही सर्विस रस्त्याने जात नाही आणि लोकांना कारण नसताना एक किलोमीटरचा वळसा मलभरे वस्तीवर जाणारा रस्ता तसेच इकडे भुलेश्वर फाटा असे बऱ्याच प्रमाणावर मोठे अंतर आहे एक ते दीड किलोमीटर अंतर किंवा केव्हा वळसा घालून जावे लागते.
दोरगे वस्तीवर लोकांना भुलेश्वर फाटा मार्गे जावे लागते मलभारेवस्ती वरील लोकांना त्याचा उपयोग करावा लागतो तेथे सुद्धा अपघात होण्याची जास्त शक्यता आहे .दसरा साठी देवाची पालखी दक्षिणे कडील मंदिरात नेण्यासाठी नागरिकांना त्रास होतो दक्षिण बाजूस मंदीर व दर्गा आहे लोकांना दर्शनास जाण्यासाठी कसरत करावी लागते.
Comments
Post a Comment