#Malshiras:आई,वडील आणि गुरू हेच खरे आपले हितचिंतक::मा.डॉ. दिलीप स्वामी
महादरबार न्यूज नेटवर्क -
फेडू समाजाचे ऋण!कणभरी!!
या म्हणण्यानुसार माळशिरस तालुक्यातील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन माळशिरस तालुका प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका एप्रिल २२ मध्ये सुरू केली आहे आज या अभ्यासिकेत २५० विध्यार्थ्यांचे नोंदणी झाली आहे हळूहळू याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळावे व आपल्या तालुक्यातील मुलांनीही अधिकारी व्हावं हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन ही मिळणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी हे प्रतिष्ठान सतत प्रयत्न करीत आहे. आठवड्यातून एक दिवस एखाद्या अधिकाऱ्याचे मार्गदर्शन आयोजित केले जाते.
दिनांक 23 /09/2022 रोजी या प्रतिष्ठामार्फत अकलूज येथील स्मृतिभवन येथे तालुक्यातील 10वी,12वी, पदवी,शिक्षण घेत असलेले तसेच स्पर्धा परीक्षा तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.
सदर शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने अध्यक्ष डॉ दिलीप स्वामी (मुख्यकार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद सोलापूर), तसेच बसवराज शिवपूजे (DYSP, अकलूज),अरुण सुगावकर (पोलीस निरीक्षक,अकलूज),दयानंद गोरे(मुख्याधिकारी, अकलूज नगरपरिषद), विनायक गुळवे(BDO ,माळशिरस पंचायत समिती),उत्तम पवार (संचालक द लॉयल अकॅडमी, पुणे), प्रोफेसर इंद्रजीत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
विनायक गुळवे( बिडीओ ,माळशिरस पंचायत समिती),बसवराज शिवपूजे(डीवायएसपी, अकलूज) यांनी प्रतिष्ठानाच्या कार्याचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्वामी साहेब यांनी आपल्या अध्यक्षणीय मनोगतात आई, वडील व गुरू हेच आपले खरे हितचिंतक आहेत. त्यांना कधी फसवू नका,त्यांना सर्व माहीत असते. आपण सर्वसाधारण कुटुंबातून आलेले आहोत त्यामुळे आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा.आपल्याला काय व्हायचं आहे ते ध्येय ठेवा. कष्टाला पर्याय नाही,कष्ट आणि संयम फार महत्वाचा असतो. कोणीही सहज मोठे होत नसते त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. वेळेला महत्त्व द्या. अश्या बऱ्याच गोष्टी त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन सांगितल्या.
प्रोफेसर इंद्रजीत यादव यांनी पर्सनल डेव्हलपमेण्ट या विषयावर बरीच माहिती उदाहरणे देऊन सांगितले.
आजचे प्रमुख मार्गदर्शन पाहुणे उत्तम पवार यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना कशाला महत्व द्यायचे, अभ्यास कसा करायचा याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच १०वी,१२वी, पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ही त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच बॅक बेंचर आणि विवाहित महिला याना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.
यावेळी डॉक्टर दिलीप स्वामी सो (आयएएस) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर,माननीय डॉक्टर बसवराज शिवपुजे सो उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज,माननीय विनायक गुळवे सो गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस, माननीय अमोल ताकमोघे, गटविकास अधिकारी पंचायत समिती निलंगा जिल्हा लातूर, माननीय लक्ष्मण डाके सो उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज, अरुण सुगावकर सो पोलीस निरीक्षक अकलूज पोलीस स्टेशन,माननीय दयानंद गोरे सो मुख्याधिकारी नगरपरिषद अकलूज,माननीय डॉक्टर इंद्रजीत यादव सो प्राचार्य सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय यशवंत नगर अकलूज,
प्रमुख मार्गदर्शक माननीय उत्तम पवार Ex पी एस आय,नायब तहसीलदार, संचालक दि लाईन अकॅडमी पुणे,
सोमनाथ कर्णवर पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणे शहर तथा अध्यक्ष माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान,अमरसिंह पाटील, उपाधिक्षक भूमी अभिलेख मुंबई तथा उपाध्यक्ष माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान,सुनील कर्चे समाज कल्याण निरीक्षक तथा सचिव माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान, ब्रह्मदेव देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सोलापूर शहर तथा संपर्कप्रमुख अधिकारी प्रतिष्ठान, हनुमंत वगरे, ग्रामसेवक,तथा सहसचिव, अधिकारी प्रतिष्ठान,धनंजय पाटील उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग करकम तथा संचालक माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान,माणिकराव म्हेत्रे पोलीस नाईक तथा प्रसिद्ध प्रमुख माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान,गोविंद कर्णवर पाटील शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज, हनुमंत कोळेकर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक,कोमल माने शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज,सुरज ठवरे शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज,संदीप घुले सहाय्यक कृषी अधिकारी,संभाजी वाघमोडे कृषी सहाय्यक,योगेश चव्हाण कृषी अधिकारी, अमित गोरे कृषी सहाय्यक,सचिन पाटील तलाठी, संतोष पानसरे ग्रामसेवक, मल्हारी लोखंडे भाऊसाहेब ,अनिता वाळुंजकर ताकभाते मॅडम तलाठी तसेच विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरसिंह पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन धनंजय माने सर यांनी केले .
Comments
Post a Comment