#Natepute:जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले मी ीएक शिक्षक आहे : गणेश बनसुडे
महादरबार न्यूज नेटवर्क - श्रीराम भगत
आपण कोणालाही सांगून बघा. त्यांच्या भुवया कौतुकानं उंचवतात. थोडा हेवा वाटतो.मी पण एक शिक्षक असतो तर, येतंच त्याच्या मनात. का येऊ नये. इतकी चैतन्य निर्माण करणारी सेवा दुसर्या कोणाच्या नशीबी नाही. वर्गातील प्रत्येक मूल हे नारागस देवरुप आहे आणि आम्ही सर्व जण सेवक आहोत. आपण मुलांसोबत खूप छान रमतो. मनात कायम या मुलांच्या आठवणी. त्यांच्या सहवासात घालवलेले दिवस अधूनमधून आठवतात.
वर्गाचा फुलोरा करणं शिक्षकाला छान जमतं मुलांसोबत विषय फुलतात आणि..दिवस इकडचा तिकडं कधी होतो ते कळतही नाही. मुलांप्रमाणे आपणही रोज शाळेत जातो. मी शाळेत आहे....शाळेत जात आहे....हे सांगणं किती छान वाटतं. मी कामाला जात नाही. कधीच नाही. शाळेतच जातो. कायमच जातो.मलाही मुलांसारख्या सुट्टया असतात. माझ्या वर्गाने एकादा सामना जिंकला की मीही उड्या मारतो. विशेष दिवस असेल तर मुलांप्रमाणे आम्हीपण नटतो. एकदम मस्त. एकंदरीत काय तर...शाळा आम्हाला कायम ताजी ठेवते. आमची कायम सदाफुली होते.
इतरांच्या चेहऱ्यावरील तेज आणि शिक्षकाच्या चेहऱ्यावरचं तेज पाहता शिक्षक खूपच टवटवीत वाटतात. बाईंचा गजरा मुलांसाठी कुवतुकाचा विषय असतो. नव्या को-या पोताची. परीटघडीची साडी.बाई आणि आई यांनाच शोभुन दिसते
कंबरेला पदर खोचून बाई जेव्हा खो देतात तेव्हा त्या.मुलांमध्ये मूल होऊन जातात. बाह्या सावरून विजयी मुद्रेने कबड्डी.कबड्डी म्हणत सर स्वार होतात....आणि मुलांकडून मस्त पकडले जातात तेव्हा तेही मनसोक्त हसतात. जगण्याचा उत्साह हा मुलांमुळे शिक्षकांना प्राप्त होतो.
निरोपाच्या वेळी मुलांसाठी व्याकुळ फक्त शिक्षकच होऊ शकतात. काय असतात यांचे ऋणानुबंध?कळत नाही.
काहीही म्हणा.हे पुण्य फक्त शिक्षकालाच लाभले,
बरेच शिक्षक खेड्यापाड्यात शिकले घडले. त्यांनी शहरी मुलांनाही घडवले.खेड्यातील मुलांनाही. सर...बाई...मुलांचे कायम आदर्श राहिले आहेत. म्हणून तर त्यांच्या घरी मुलांची कायम अलोट गर्दी असते. मुलं लय भारी असतात.हे सारं असं होतं.मग अभिमान वाटु लागतो..
मी एक शिक्षक असल्याचा.
आचार्य चाणक्य शिक्षक होते
महात्मा फुले शिक्षक होते.
सावित्रीबाई शिक्षीका होत्या.
लोकमान्य शिक्षक होते.
सावरकर शिक्षक होते.
डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्ण, डाॅ.ए.पी.जे.कलाम ,
आचार्य अत्रे शिक्षक होते....
ताराबाई मोडक,अनुताई वाघ शिक्षिका होत्या. साने गुरूजी शिक्षक होते. आज मीही शिक्षक आहे. अभिमान आहे.
का नाही लोकांना हेवा वाटणार. वाटणारच. ते विचारतील,कसं काय बुवा हे झालं ? त्यांना मस्त संत नामदेव महाराजांचा अभंग ऐकवावा.
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले सर्व शिक्षकांना समर्पित!!
सहशिक्षक गणेश बनसुडे गुरुजी नातेपुते ता माळशिरस जिल्हा सोलापूर मो नं, 98226 43482
Comments
Post a Comment