#Dound:कडेठाण गावचे ग्रामदैवत श्री सांजोबा महाराज यात्रेचे आयोजन
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
दौंड तालुक्यातील कडेठाण गावातील ग्रामदैवत श्री सांजोबा महाराज यात्रा रविवार दि १६ व १७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे
मौजे कडेठान येथिल ग्रामदैवत श्री संजोबा महाराज यांच्या मूर्ती पूजन रविवारी पहाटे ५.३० वा.देवाची पूजा होईल. तसेच दुपारी १२.०० वा. ग्रामदैवताची मानाची काठी निघणार आहे. सायंकाळी ६.००वा. देवाची पालखी (छबीना) मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या अतिशबाजीत छबीन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी ६.०० वा. श्री सांजोबा महाराज पालखी सोहळा पारंपारिक वाद्याच्या गजरात गाव प्रदक्षणा गावकरी मानकरी मान्यवरांच्या उपस्थितीत जयघोष करीत गावातील हनुमान मंदिरामध्ये आणली जाते.
मौजे कडेठाण यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने सोमवार दि १७ रोजी सकाळी ९.०० वा, मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा हजऱ्याचा लोककला मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे दुपारी ३:०० वाजता श्री सांजोबा महाराज यांच्या पालखी छबीना मिरवणूक होणार आहे, तसेच सोमवारी रात्री ९:००वा, मंगला बनसोडे यांचा बहुरंगी तमाशा लोक मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
मौजे कडेठाण यात्रा उत्सव समिती आजी माजी प्रमुख मान्यवरांच्या व युवा तरुणांनी यांच्या सहकार्यातून गाव यात्रेचे आयोजन
Comments
Post a Comment