#Indapur:माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लुमेवाडी येथील जोधपुरी बाबांच्या दर्गाहचे दर्शन घेतले
लुमेवाडीचा उरूस उत्साहात सुरु
महादरबार न्यूज नेटवर्क - बाळासाहेब सुतार
लुमेवाडी (ता.इंदापूर) येथील प्रसिध्द हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबां( रहे.)च्या दर्गाहचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.17) रात्री दर्शन घेतले. जोधपुरी बाबांचा उरूसास सर्वधर्मीय भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी जोधपुरी बाबांच्या मजारवरती फुलांची चादर अर्पण केली. याप्रसंगी दर्गाह ट्रस्टच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जोधपुरी बाबांचा दर्गाह महाराष्ट्रभर प्रसिद्धीस आलेला आहे. जोधपुरी बाबांचे आशीर्वाद आपले सर्वांच्या पाठीशी आहेत. या दर्गाहच्या विकासासाठी आपण आजपर्यंत सर्व प्रकारची मदत केलेली असून, आगामी काळातही सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. यावेळी नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, संचालक हरिभाऊ घोगरे, संजय बोडके, बाळासाहेब मोहिते, सरपंच शितल मोहिते, रणजीत वाघमोडे, चेअरमन निलेश बोडके, सरपंच आबासाहेब बोडके, माजी सरपंच उस्मान शेख, कमाल जमादार, सरपंच सुनील जगताप, माजी सरपंच संतोष मोरे, आण्णासोहेब काळे, विलास ताटे, सह इतर सर्व यात्रा कमिटी व ग्रामस्थ आणि पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबांच्या ऊरूसाचे हे 29 वे वर्ष आहे. सोमवारी संदल मिरवणूक करण्यात आली. दर्गाहला उरूसानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. लुमेवाडी येथे निरा नदीकाठी सर्वधर्मियांचे श्रध्दांस्थान असलेला सुफी संत फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबा ( रहे.) यांचा दर्गाह आहे. या उरूसास पुणे, सोलापूर, मुंबई, सांगली, सातारा, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड आदी जिल्ह्यातील भक्तांबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातूनही मोठ्या संख्येने आलेल्या भक्तांनी उपस्थिती लावली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामस्थ व भाविकांची संवाद साधला.
Comments
Post a Comment