#Natepute:दहिगावला दूषित पाणी पुरवठा होत असल्याने बाबुराव खिलारे ग्रामस्थ सोबत करणार आमरण उपोषण
महादरबार न्यूज नेटवर्क -
दहिगाव ता. माळशिरस या गावात ग्रामस्थांना पिण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे पाणी हे दूषित असून अनेक वेळा ग्रामसेवक यांना सांगूनही ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पंधरा दिवसानंतर भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्च्याचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबुराव खिलारे व गावातील ग्रामस्थ माळशिरस पंचायत समिती समोर अमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन गट विकास अधिकारी माळशिरस यांना 11 ऑक्टोबर रोजी देण्यात आले.
निवेदनामध्ये म्हटलं आहे की दहिगाव ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना होणाऱ्या दूषित पाण्याबद्दल दहिगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कर्णे यांना अनेक वेळा ग्रामस्थांनी समक्ष भेट घेऊन सांगूनही याकडे ते दुर्लक्ष करीत आहे कामात कुचराई व वेळ काढूपणा हालगर्जपणा करीत आहे गावाला दूषित पाणीपुरवठा गेले तीन वर्षापासून होत आहे तरी ग्रामसेवक याविषयी गांभीर्याने घेत नाही त्यांच्या हालगर्जीपणामुळे गावातील लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त होत चालले आहे तरी संबंधित ग्रामसेवक गावातील राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय भाग घेत आहेत ग्रामसेवक मौजे दहिगावला रुजू झाल्यापासून आज अखेरपर्यंत त्यांची दप्तर तपासणी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून व्हावी व संबंधित ग्रामसेवक कर्णे यांच्यावरील खाते अंतर्गत कारवाई करण्यात यावी आम्हा सर्व ग्रामस्थांना लवकरात लवकर चांगले पाणीपुरवठा करण्यात यावा व गाव रोगमुक्त करण्यात यावे.
अन्यथा आम्ही पंधरा दिवसानंतर आम्हाला न्याय नाही मिळाल्यास आम्ही नाइलाजस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्री, पाणीपुरवठा मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार व माळशिरसचे आमदार यांना देण्यात येणार असल्याचे बाबुराव खिलारे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment