#Malshiras:मनरेगाच्या सर्व शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी - सहाय्यक गटविकास अधिकारी ए . बी . मोरे



ग्रामरोजगार सेवक यांचे तीन दिवशीय समृद्ध गाव, लखपती कुटुंब, नियोजन प्रशिक्षण शिबीर संपन्न 

महादरबार न्यूज नेटवर्क  -
माळशिरस तालुका पंचायत समिती स्तरावर विविध मानरेंगाच्या शासकीय योजनांची माहिती शेवटच्या गरजू घटकापर्यंत पोहोचवणे हे रोजगार सेवकांचे कर्तव्य आहे.ते प्रत्येक रोजगार सेवकाने आपले कर्तव्य हे जबाबदारी समजून काम करावे,याकडे आपण जातीने लक्ष दिल्यास गावनिहाय एकही गरजू लाभार्थी वंचित राहणार नाही.असे कर्तव्य दक्ष सहाय्यक गटविकास अधिकारी ए . बी . मोरे म्हणाले. 
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांचे तीन दिवशीय प्रशिक्षण शिबीर पंचायत समितीच्या सभागृहात पार पडले.यामध्ये कार्यशाळा ,शिवार फेरी यांची प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली.गटविकास अधिकारी माळशिरस यांच्या सूचनेनुसार माळशिरस तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेची नव्याने कार्यकारणी जाहीर करून उपस्थित सर्व ग्रामरोजगार सेवकान मधुन संघटनेची स्थापना करण्यात आली.यामध्ये अध्यक्ष  अशोक राजगे उपाध्यक्ष मारुती खताळ,सचिव संतोष वाघमोडे ,प्रसिद्धीप्रमुख,अक्षय साठे व संजय हुलगे यांची निवड करून यांचा सन्मान प्रशिक्षक अमोल धावणे माढा व सुधीर पवार परांडा यांच्या वतीने करण्यात आला . तसेच ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने तालुक्यातील रोजगार सेवकांच्या विविध समस्या शासन दरबारी पोहचाव्यात तसेच मा.गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत ऑफिस मध्ये टेबल,खुर्ची,कपाट व स्टेशनरी उपलब्ध करून देण्यात यावी.व प्रत्येक महिन्याला ग्रामरोजगार सेवकांचे मानधन ग्रामपंचायतच्या खात्यावर न जमा करता ते थेठ ग्रामरोजगार सेवकांच्या खात्यावर जमा करण्यात यावे असे सहाय्यक गटविकास अधिकारी  ए . बी . मोरे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले .

यावेळी ग्रामरोजगार सेवकांच्या प्रशिक्षणास प्रारंभ दि.१० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर पर्यंत तिन दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले या शिबीरात मनरेगा असणारी कामे यावर प्रशिक्षण अधिकारी म्हणून प्रशिक्षक अमोल धावणे परांडा व सुधीर पवार माढा यांनी माळशिरस तालुक्यातील रोजगार सेवकांना महात्मा गांधी रोजगार हमी योजने संबंधित राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना ,करावयाची कामे ,केलेल्या कामांचे नियोजन व विस्तृत माहिती दिली.तसेच समृद्ध गाव लखपती कुटुंब नियोजन या प्रशिक्षणात प्रत्यक्षरीत्या गाव समृद्ध कसे करावे याविषयी ग्रामरोजगार सेवकांना सविस्तर मार्गदर्शन केले.

रोजगार हमी योजना ही वंचित घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी थेट गाव पातळीवर कुटुंब सर्वेक्षण याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले तसेच माथा ते पायथा नियोजन करून गावातील कुटुंबाच्या व सार्वजनिक गरजा त्यात नमूद करण्यात येऊन समाजातील सर्व घटकांना समोर ठेवून नियोजन करण्यात आले समृद्ध गाव लखपती कुटुंब कसे होतील व प्रत्येक कुटुंबापर्यंत योजना पोहोचून त्या कुटुंबाचा विकास कसा साधता येईल त्यासाठी ग्रामरोजगार सेवक हे समृद्ध मित्र रोजगार मित्र म्हणून काम करतील. ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या गावातील कुटुंबाचा विकास कसा साधावा याबाबत नियोजन कसे करावे याविषयी योग्य ते मार्गदर्शन व योजने अंतर्गत कुटुंब व गाव सर्वेक्षण शिवार फेरी या माध्यमातून प्रशिक्षक अमोल धावणे व सुधीर पवार यांनी संखोल माहीती दिली.

ग्रामरोजगार सेवकांना तीन दिवस चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिल्यामुळे माळशिरस तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने प्रशिक्षक ट्रेनर अमोल धावणे व सुधीर पवार यांनचा सन्मान करण्यात आला .तसेच पचायत समिती माळशिरस सभागृहात तालुक्यातील प्रशिक्षणार्थी ग्रामरोजगार सेवक यांनी चांगल्या प्रकारे तिन दिवस प्रशिक्षण पूर्ण केल्यामुळे पंचायत समितीच्या वतीने ग्रामरोजगार सेवक यांना सहाय्यक गटविकास अधिकारी ए . बी . मोरे  यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले .

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी ए . बी . मोरे , प्रशिक्षक अमोल धावणे व सुधीर पवार , विस्तार अधिकारी के . व्हि . खरात , ए. टी . डोके , व्हि . बी . कोळेकर , तांत्रीक अधिकारी अमोल पाटील , कनिष्ठ सहाय्यक पी . एस .बुऱ्हानपुरे , ए .पि . ओ . अर्जुन शिंदे , ऑपरेटर शरद वाघमारे यांच्यासह तालुक्याभरातील प्रशिक्षणार्थी ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम