महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका उपाध्यक्ष रोहित खाडे यांच्या नेतृत्वाखाली महाळुंग नगरपंचायतीच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना घेऊन दि .१४ रोजी नगरपंचायतीवर मोर्चा काढला. निवडणूक होऊन वर्ष संपले तरी कोणत्याच प्रभागात निधी खर्च झाला नाही की कसलेच काम झाले नाही. सध्या चिकणगुण्या , डेंगू सारख्या आजाराने थैमान घातले असतानाही नगरपंचायतीकडून कसलीच यंत्रणा राबवली गेली नाही. पावसामुळे तुंबलेल्या गटारींचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे यामुळे तेथील स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळेच झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी दि .१४रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.
जर येणाऱ्या पंधरा दिवसात काहीच प्रक्रिया राबवली गेली नाही तर १ नोव्हेंबर रोजी यापेक्षा तिव्र आंदोलन करू असा इशारा माळशिरस तालुका उपाध्यक्ष रोहित खाडे यांनी दिला.
यावेळी निवेदन स्वीकारताना कार्यकारी अधिकारी गव्हाणे साहेब , नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी चव्हाण , उपनगराध्यक्ष भीमराव रेडे प्रभाग एक च्या नगरसेविका कल्पना काटे राष्ट्रवादी चे नेते राहुल रेडे व अन्य नगरसेवक उपस्थित होते. तसेच या आंदोलनाला मनसे चे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे , माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश टेळे माळशिरस नगरपंचायत चे नगरसेवक कैलास वामन व दादासाहेब शिंदे, उपाध्यक्ष बाबा ननवरे , अॅड. दादासाहेब पांढरे , रशीद शेख , माळशिरस शहर अध्यक्ष सुरेश वाघमोडे , महाळुंग विभागप्रमुख अजित जाधव , श्रीपुर शहराध्यक्ष नंदन गायकवाड , आकाश शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments